Malad News: समुद्राकडे जाणारा तरंगता कचरा रोखणारा पथदर्शी प्रकल्प मालाड खाडीत सुरू

मालाड आणि ट्रॉम्बे खाडी येथे इंटरसेप्टर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समुद्रात जाणारा प्लास्टिक व इतर कचरा नदी-नाल्यांमध्येच अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Malad News
Malad NewsPudhari
Published on
Updated on

मालाड: मालाड खाडीत समुद्रात प्लास्टिक, इतर तरंगता कचरा नदी-नाल्यांमध्येच अडविण्यासाठी 'द ओशन क्लीनअप' या जागतिक स्वयंसेवी संस्थेचा 'इंटरसेप्टर' पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

'द ओशन क्लीनअप' संस्था महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्लास्टिक फिशर आणि युनायटेड वे मुंबई यांच्या सहकार्याने हा पायलट प्रकल्प राबवत आहे. मालाड आणि ट्रॉम्बे खाडी येथे इंटरसेप्टर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समुद्रात जाणारा प्लास्टिक व इतर कचरा नदी-नाल्यांमध्येच अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Malad News
Student Protest: मुंबईतील १६ एफआयआरचे काय? कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांचे सरकारकडे लक्ष

संस्थेच्या अभ्यासानुसार, मुंबईतून दरवर्षी ५० लाख किलो प्लास्टिक अरबी समुद्रात वाहून जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रायोगिक टप्प्यात या इंटरसेप्टर प्रणालीद्वारे कचरा संकलनासाठी महापालिकेला कोणतेही शुल्क द्यावे लागत नसल्याने महापालिकेच्या खर्चात बचत होणार असल्याचे सांगण्यात आले.

Malad News
Sabudana Demand: आषाढी एकादशीला राज्यात ८०० टन साबुदाण्याची विक्री

पर्यावरण संरक्षणाबरोबरच सार्वजनिक निधीचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.अलीकडील मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे जुहू किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा वाहून आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news