Crime News: मालाडमध्ये धक्कादायक प्रकार! श्वानासोबत अनैसर्गिक अत्याचार; 45 वर्षीय व्यक्तीला बेड्या

महिलेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला प्रकार; मालाड पोलिसांची तत्काळ कारवाई
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

मुंबई: श्वानासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 45 वर्षांच्या आरोपीविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मालाड येथील एका खासगी क्लिनिकजवळ घडलेला हा प्रकार एका महिलेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्याचे सांगण्यात आले.

यातील तक्रारदार मूळचे बिहारचे रहिवासी असून सध्या वसई येथे राहतात. मालाडच्या आर्लेम परिसरात प्राण्यांचे एक खासगी क्लिनिक असून तिथे तो कामाला आहे. 26 एप्रिल रोजी क्लिनिकमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे सर्वच कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत होते.

Crime News
Municipal Officer Crime Case: लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणाऱ्या साहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला याला कोठडी

याच दरम्यान तिथे मालाडच्या मालवणी परिसरात राहणारी एक महिला तिच्या मांजरीला उपचारासाठी घेऊन आली होती. रात्री साडेअकरा वाजता मांजरीवर उपचार करून ही महिला निघून गेली. याच दरम्यान या महिलेने तक्रारदाराला बोलावून एक व्यक्ती श्वानासोबत अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचे दाखविले.

या प्रकारानंतर त्याच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी संबंंधित व्यक्तीला ताब्यात घेत जाब विचारला. तपासात या व्यक्तीचे नाव नरेश असल्याचे तसेच तो मालाड येथे राहत असल्याचे उघडकीस आले. हा श्वान क्लिनिकच्या शेजारी असलेल्या डेअरीच्या मालकाचा होता.

Crime News
Mumbai Rain: मुंबईची तुंबई टाळण्यासाठी एआय मदतीला; आढवा बैठकीत आयुक्तांची माहिती

या घटनेनंतर तक्रारदाराने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल केला. यानंतर मालाड पोलिसांची एक टिम तिथे आली. यावेळी महेश यादवने घडलेला प्रकार सांगून आरोपी नरेशविरुद्ध तक्रार केली. यानंतर श्वानासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी नरेशविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news