'Majhi Ladki Bahin Yojana'; ...तर सेतू केंद्राचा परवाना रद्द

देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत इशारा
Devendra Fadnavis
सेतू केंद्राचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ' मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने'त नाव नोंदणी करण्यासाठी राज्यातील सेतू केंद्र चालकांना ५० रूपये राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे त्यांनी लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३) विधान परिषदेत बोलताना दिला.

Devendra Fadnavis
Mazi Bahin Ladki Yojana : 'माझी बहीण लाडकी योजने'साठी पैसे मागणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

या योजनेसाठी लाभार्थ्यांचे रेशन कार्ड असेल, तर त्यांना डोमिसाईलची गरज नाही. योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राज्याच्या विकासात भर घालणाऱ्या सर्व प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कोकणातील पाणी तापी नदीत आणण्याचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या बंदराचा विकास गती करण्यात येईल, या बंदरामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. वैनगंगा - नळगंगा नदी प्रकल्प पूर्ण केला जाईल. पेपरफुटी प्रकरणात कडक कायदा केला जाईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news