Vidhan Parishad Election Result: विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; १७ पैकी १६ जागा जिंकल्या

मविआला पराभवाचा धक्‍का
Vidhan Parishad Election Result
Vidhan Parishad Election Resultpudhari
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून १७ पैकी १६ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) यांच्या महायुतीने बहुतेक मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

Vidhan Parishad Election Result
Operation Tiger Success: अखेर ठाकरेंचे सहा बंडखोर खासदार शिंदे सेनेत दाखल

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत विजय मिळवला. विशेष म्हणजे, गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला.

गिते यांना मिळालेल्या व्यापक पाठिंब्यामुळे नाशिकचा निकाल राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीला भाजपातून आधीपासून विरोध होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शब्द दिल्याने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, शिंदेंच्या उमेदवाराला पराभूत करणारे भाजपचे अपक्ष गिते आता शिंदे गटातच दाखल होत आहेत.

निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी पक्षाला दगा देत उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान संपुष्टात आले होते.

उर्वरित मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानानंतर महायुतीने बहुतेक ठिकाणी विजय मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. हा पराभव महाविकास आघाडीला धक्का देणारा आहे. तर सत्ताधारी पक्षाने नाशिक वगळता सर्वत्र एकजूट राखल्याचे स्पष्ट झाले आहे.

Vidhan Parishad Election Result
Farmer Loan Waiver: शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी २० हजार ५५२ कोटींची तरतूद

विजयी उमेदवार

छत्रपती संभाजीनगर : सुहास शिरसाट (भाजप)

भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप)

परभणी-हिंगोली : सय्यद खान (शिवसेना)

सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप)

धाराशिव-लातूर : बसवराज पाटील (भाजप)

नागपूर : राजीव पोतदार (भाजप)

जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप)

अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)

नांदेड : अमर राजूरकर (भाजप)

नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष)

बिनविरोध विजयी उमेदवार

ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)

यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)

कोकण : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

पुणे : विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

वर्धा-चंद्रपूर : अरुण लखानी (भाजप)

अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजप)

गोकुळ गितेंना शिंदे गटाची ऑफर; विमानाने मुंबईला रवाना होणार?

नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले गोकुळ गिते यांना शिवसेना शिंदे गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री उदय सामंत यांनी गितेंच्या समर्थकांना फोनवरून निमंत्रण दिले असून, थोड्याच वेळात स्पेशल विमानाने आमदार गोकुळ गिते मुंबईला रवाना होणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news