

Maharashtra Weather Update
महाराष्ट्रातील बहुतांश भागात पुढील ४ दिवस हलका ते मध्यम पाऊस राहील, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पडणार असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.
पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. दरम्यान, कोकणातील काही भागात गेल्या २४ तासांत मुसळधार ते अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान, देशातील बहुतांश भागात ५ जून ते १२ जून दरम्यान पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी राहणार आहे. तर १२ जून ते १९ दरम्यानच्या आठवड्यात वायव्य भारत, पूर्व भारत, उत्तर-पूर्व भारतात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी राहील. तर याच कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पाऊस सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
१९ जून २६ जून दरम्यान विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहील. त्यानंतर २६ जून ते ३ जुलै दरम्यान देशातील बहुतांश भागत पावसाचे सामान्यपेक्षा अधिक राहील. या कालावधीत गुजरात, कर्नाटकचा किनारी भाग आणि महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.