Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा पाऊस बरसणार? मुंबईत उकाडा कायम, हवामान विभागाचा अंदाज

आयएमडीकडून काही भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता; मुंबईत तापमान ३६ अंशांवर
Mumbai Rain
Mumbai RainPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्राच्या काही भागांत पुढील काही दिवसांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

दुसरीकडे, मुंबई आणि ठाण्यात १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील आठवड्यात (२० ऑक्टोबर) मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Mumbai Rain
Saudi Arabia Flights: एअर इंडियाचा मोठा निर्णय! सौदी अरेबियासाठीची विमानसेवा २० ऑक्टोबरपर्यंत बंद

मागील चार दिवसांच्या तुलनेत मुंबई शहर आणि उपनगरांतील कमाल तापमानात किंचित घट असली तरीही पारा पस्तिशीपार कायम आहे. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये शुक्रवारी किमान २४ आणि कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमान होते.

शनिवारी (२५/३६ अंश सेल्सिअस) त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. मात्र, रविवारी (२५/३७ अंश सेल्सिअस) तापमानात पुन्हा वाढ होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे.

Mumbai Rain
Sachin Vaze Bail News: सचिन वाझेला जामीन मिळणार की नाही? उच्च न्यायालयाचा निकाल राखून

प्रादेशिक हवामान केंद्राने (आरएमसी) शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या तत्काळ हवामान इशाऱ्यात, दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

या अंदाजानुसार, शनिवार-रविवार आणि पुढील आठवड्याच्या सुरुवातीला कोकण पट्टा, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत हवामानात बदल होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news