Employment growth maharashtra : बेरोजगारीच्या दरात घट; महिला कामगार वाढले

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील दिलासादायक आकडेवारी
Employment growth maharashtra
बेरोजगारीच्या दरात घट; महिला कामगार वाढलेpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे महाराष्ट्रात सकारात्मक बदल दिसून आला आहे. रोजगारामुळे राज्यातील पुरुष व महिला बेरोजगारीच्या दरात घट झाल्याचे आर्थिक पाहणीतील आकडेवारीवरून समोर आले आहे.

पुरुष बेरोजगारी दर 4.9 टक्क्यांवरून 3.7 टक्के, तर महिला बेरोजगारी दर 5.4 टक्क्यांवरून 2.7 टक्के इतका कमी झाला आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत ई-श्रम पोर्टलवर राज्यातील तब्बल 1 कोटी 83 लाख कामगारांची नोंदणी झाली असून त्यापैकी 55.8 टक्के महिला असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात रोजगाराच्या संधी वाढत असल्याने गेल्या काही वर्षांत सकारात्मक बदल दिसून येत आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या दरात घट झाली असून महिला कामगारांचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. नियतकालिक श्रमबल पाहणी 2023-24च्या आकडेवारीनुसार राज्यातील रोजगार परिस्थितीतही सुधारणा दिसून येते.

Employment growth maharashtra
Rajya Sabha election Maharashtra : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध

15 वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्तींसाठी श्रमशक्ती सहभाग दर 59 टक्के इतका झाला असून 2018-19 मध्ये तो 53.3 टक्के होता. यामुळे रोजगार क्षेत्रात अधिक लोक सहभागी होत असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे महिला श्रमशक्ती सहभाग दरात मोठी वाढ झाली आहे. 2018-19 मध्ये हा दर 31.6 टक्के होता, तो आता 40.1 टक्क्यांवर पोहोचला आहे.

कामगार लोकसंख्येचे प्रमाण 57 टक्क्यांवर

कामगार लोकसंख्या प्रमाण 50.6 टक्क्यांवरून 57 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याचबरोबर बेरोजगारी दरातही घट झाली असून तो 5.0 टक्क्यांवरून 3.3 टक्क्यांवर आला आहे. पुरुष बेरोजगारी दर 4.9 टक्क्यांवरून 3.7 टक्के, तर महिला बेरोजगारी दर 5.4 टक्क्यांवरून 2.7 टक्के इतका कमी झाला आहे. या आकडेवारीवरून राज्यातील रोजगाराच्या संधी वाढत असून विशेषतः महिलांच्या सहभागामुळे रोजगार क्षेत्राला अधिक बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Employment growth maharashtra
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा कोण आहेत?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news