

मुंबई: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गारपीट आणि पावसामुळे पाच ते सात अंशांनी खाली आला होता. मात्र, अवकाळीचे सावट संपताच 10 एप्रिलपासून पाऱ्याने उसळी घेतली आहे. अकोला येथे शुक्रवारी 40.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
एप्रिल महिन्याची सुरुवात जोरदार गारपीट व पावसाने झाली होती. त्यामुळे कमाल तापमान 42 वरून 32 ते 35 अंशांवर खाली आले होते. वातावरणात आर्द्रता, जमिनीत ओलावा आणि ढगाळ वातावरणामुळे असे वातावरण 9 एप्रिलपर्यंत होते. मात्र, शुक्रवारपासून वातावरणात कमालीचा उकाडा पुन्हा जाणवू लागला आहे.