

मुंबई: नवी दिल्ली येथे झालेल्या 39व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर क्योरुगी आणि 14व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर पुमसे तायक्वांदो स्पर्धेत क्योरुगी प्रकारात महाराष्ट्राला 4 सुवर्णांसह डझनभर पदकांची कमाई केली.
22 किलोखालील मुलींच्या गटात स्वरा कदम, 24 किलोखालील गटात राधा गांद्रे, 26 किलोखालील आर्या होले तसेच 50 किलोवरील मुलांच्या गटात आयुष शेट्टीने सुवर्णपदक पटकावले. रौप्यपदक विजेत्यांमध्ये 20 किलोखालील मुलींच्या गटांमध्ये मनस्वी आंधळे, 29 किलोखालील गटात स्वरा क्षीरसागर, 16 किलोखालील मुलांच्या गटात आरुष दळवी, 21 किलोखालील गटात आणि 50 किलोखालील गटात गणेश नगरगोजेचा समावेश आहे.
35 किलोखालील मुलीच्या गटात स्वरा येवले, 27 किलोखालील मुलांच्या गटात तनिष खवणेकर आणि 32 किलोखालील गटात रुद्र गावंडेने कांस्यपदक मिळवले. 39 व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर क्योरुगी आणि पुमसे तायक्वांदो स्पर्धेमध्ये सागर गरवालिया यांना सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.