School Admission Age Criteria : पहिलीच्या प्रवेशासाठी आता सहा वर्षे पूर्ण होणे बंधनकारक

नर्सरी ते पहिली प्रवेशाचे वय टप्प्याटप्प्याने बदलणार
School Admission Age Criteria
School Admission Age Criteria pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : पूर्वप्राथमिक शिक्षणापासून पहिलीच्या प्रवेशापर्यंत मुलांचे किमान वय निश्चित करताना आता टप्प्याटप्प्याने नवे निकष लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून नर्सरीसाठी तीन वर्षे, २०२८-२९ पासून ज्युनिअर केजीसाठी चार वर्षे, २०२९-३० पासून सीनिअर केजीसाठी पाच वर्षे, तर २०३०-३१ पासून इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे. शालेय शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जारी करून हे निकष निश्चित केले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींनुसार पायाभूत शिक्षणाच्या वयोगटात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी राज्यात पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे वयाचा निकष असला, तरी पाच वर्षे पूर्ण झालेल्या बालकांनाही प्रवेशाची पात्रता होती. परिणामी, राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अशा विविध मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी वयाची वेगवेगळी गणना केली जात होती.

School Admission Age Criteria
MPSC Old Documents Disposal : एमपीएससीची जुनी कागदपत्रे विल्हेवाटीला स्थगिती

पूर्वप्राथमिक वर्गांच्या प्रवेशासाठीही वयाची एकसमान अट नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. ही विसंगती दूर करून प्रवेशप्रक्रियेत एकरूपता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शाळा प्रवेशाच्या वयोमर्यादेबाबत राज्यातील विविध शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये असलेली तफावत दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार, २०२७-२८ मध्ये नर्सरीत प्रवेश घेणाऱ्या बालकाचे ३० जून रोजी किमान तीन वर्षे वय पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यात वयाची अट एका वर्षाने वाढवली जाणार आहे. त्यामुळे नर्सरीपासून पहिलीपर्यंतच्या चार वर्षांच्या शैक्षणिक टप्प्यांचे नियोजन निश्चित होणार आहे. शासन निर्णयानुसार, पूर्वप्राथमिक वर्ग आणि पहिलीच्या प्रवेशासाठी शाळाप्रमुख स्तरावर किमान व कमाल वयाच्या निकषांत १५ दिवसांची सूट देता येणार आहे.

School Admission Age Criteria
Rahuri District Bank Election: आता थांबणार नाही! राहुरीतून सत्यजित कदम ठाम; तनपुरेंची कोंडी

आधीपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सूट

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नर्सरी ते पहिलीमध्ये आधीपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना हे नवे वयाचे निकष लागू होणार नाहीत. तसेच, मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना नव्या वयोमर्यादेचा अडथळा राहणार नाही. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षांतील प्रवेशासाठी पालकांना मुलांच्या जन्मतारखेनुसार नियोजन करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news