Pahalgam Terror Attack | राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Devendra Fadnavis news
Pahalgam Terror Attack | राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही सुरू file photo
Published on: 
Updated on: 

Pahalgam Terror Attack

मुंबई : केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केल्यानंतर महाराष्ट्राने राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून पाकिस्तानी प्रवाशांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात आहे. जो कोणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis news
देशविरोधी शक्तींचा नायनाट केल्याशिवाय भारत शांत बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news