Premium Speed Post: २४ स्पीड पोस्टची व्याप्ती वाढली! महाराष्ट्र सर्कलची प्रगतीकडे वाटचाल; २७ नवीन मार्गिका कार्यान्वित

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमधील ग्राहकांना जलद डिलिव्हरी मिळणार; कागदपत्रांसाठी २५ आणि पार्सलसाठी २ मार्गिका निश्चित
Premium Speed Post
Premium Speed PostPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारच्या सेवा नेहमीच भारतीय टपाल विभाग देत असते. आता महाराष्ट्र सर्कलने प्रीमियम २४ स्पीड पोस्ट सेवेचा विस्तार सध्याच्या मेट्रो-टू-मेट्रो नेटवर्कच्या पलीकडे करण्याची घोषणा केली आहे.

याबाबत टपाल विभागाने दिलेली माहिती अशी की, मुंबई,ठाणे,नवी मुंबई,पुणे,नाशिक व नागपूर मधील किरकोळ आणि घाऊक ग्राहकांना जलद, वेळेत डिलिव्हरी देण्यासाठी महाराष्ट्र सर्कल येथे एकूण २७ नवीन मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत.ज्यामध्ये २५ कागदपत्रांसाठी व २ पार्सल करिता आहेत.

सध्या २४ स्पीड पोस्ट सेवा दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या सहा प्रमुख शहरांना जोडते.मुंबईत २९ नियुक्त टपाल कार्यालय (पोस्ट ऑफिस) इतर मेट्रो शहरांसाठी २४ स्पीड पोस्ट बुकिंग स्वीकारतात तर येणारे टपाल (डाक )संपूर्ण शहरात वितरित केल्या जातात.नवीन विस्तारित मार्गिका अतिरिक्त डिलिव्हरी पिन कोडवर जलदगतीने ग्राहकांची मागणी पूर्ण करणार आहे.

Premium Speed Post
Mumbai Land Acquisition: विकासकामांसाठी भूसंपादन झाले, पण पुनर्विकासात अडथळे!

दरम्यान,नवीन दस्तऐवज मार्गिका या २५ आहेत.त्यात मुंबईहून बाहेर जाणाऱ्या ६ मार्गिकांचा समावेश आहे.मुंबईला एनसीआर,ठाणे व नवी मुंबई,नाशिक, पुणे,नागपूर आणि अहमदाबादशी जोडणार आहे.प्रतिमार्गिका या २८ नियुक्त टपाल कार्यालयामध्ये बुकिंग स्वीकारले जाणार आहे.

तसेच ठाणे व नवी मुंबईतून बाहेर जाणाऱ्या १० मार्गिका आहेत.यात ठाणे आणि नवी मुंबईला मुंबई, चेन्नई,कोलकाता,हैदराबाद, बेंगळुरू,दिल्ली,नाशिक, पुणे,नागपूर आणि अहमदाबाद शी जोडल्या जाणार आहेत.याचे बुकिंग प्रतिमार्गिका १२ नियुक्त टपाल कार्यालयामध्ये स्वीकारणार आहे.

Premium Speed Post
Chandivali Car Accident: चांदिवलीत हिट अँड रन; मद्यधुंद अवस्थेत महिलेने चौघांना ठोकरले

याचबरोबर आत येणाऱ्या ९ मार्गीका असून यामध्ये एनसीआर ते मुंबई, अहमदाबाद ते मुंबई, दिल्ली,चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुर, अहमदाबाद ते ठाणे आणि नवी मुंबई, चेन्नई ते पुणे याचा समावेश आहे तर मुंबई-पुणे आणि मुंबई-अहमदाबाद अशा २ नवीन पार्सल मार्गिका सुरू करण्यात आल्या आहेत.

याचे बुकिंग मुंबईतील २९ टपाल कार्यालय मध्ये स्वीकारले जाणार आहे.तसेच पुणे येथील ३८ व अहमदाबाद येथील ५ वितरण कार्यालयां द्वारे वितरण सुलभ होणार आहे.या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही मार्गिका दस्तऐवज सेवा देखील हाताळणार आहे.

किरकोळ आणि घाऊक ग्राहक नियुक्त बुकिंग कार्यालयांमध्ये २४ स्पीड पोस्ट सेवांचा लाभ घेऊ शकतात.तेव्हा जवळच्या टपाल कार्यालयामध्ये ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

प्रमुख टपाल कार्यालय अन् सुविधा...

प्रमुख बुकिंग केंद्रे : विलेपार्ले बिझनेस पोस्ट सेंटर,वाशी,दादर, मुंबई जीपीओ आणि जेकब सर्कल पोस्ट ऑफीस

प्रमुख वितरण कार्यालये: कांदिवली पश्चिम मालाड पूर्व,कांदिवली पूर्व, साकीनाका टपाल कार्यालय व आझादनगर टपाल कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news