Chandivali Car Accident: चांदिवलीत हिट अँड रन; मद्यधुंद अवस्थेत महिलेने चौघांना ठोकरले

स्थानिकांच्या तत्परतेमुळे जखमींवर तातडीने उपचार
Chandivali Car Accident: चांदिवलीत हिट अँड रन; मद्यधुंद अवस्थेत महिलेने चौघांना ठोकरले
Published on: 
Updated on: 

घाटकोपर: मुंबईतील चांदिवली परिसरातील नहार शक्ती विभागात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे.

एका मद्यधुंद महिला कार चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत दोन दुचाकींना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईत ड्रंक एंड ड्राईव्हमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अपघाताचा वेग एवढा प्रचंड होता की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला. घटना घडताच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पुढाकार घेऊन जखमींना रस्त्यावरून बाजूला केले. या भीषण अपघातात हिमांशू परब, अजय भालेराव, संकेत जॉईल आणि निकेत कदम हे चार तरुण जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी जखमींना राजावाडी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कार चालवणारी महिला प्रीती सिंग आणि तिच्यासोबत गाडीत असलेल्या आणखी एका व्यक्तीला साकीनाका पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.

Chandivali Car Accident: चांदिवलीत हिट अँड रन; मद्यधुंद अवस्थेत महिलेने चौघांना ठोकरले
Dadar Kabutarkhana: दादरमधील कबुतरखान्याला पारदर्शक ॲक्रेलिकचे कवच; दाणे टाकणाऱ्यांना रोखण्यासाठी महापालिका सतर्क

पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली आहे. प्रीती सिंग ही मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा स्थानिकांचा गंभीर आरोप असल्याने, पोलिसांनी तिच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहेत.

या अहवालानंतर ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या कलमांखाली साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साकीनाका पोलिसांचे पथक रात्रीपासूनच पहाटेपर्यंत घटनास्थळी तपास आणि पंचनामा करत होते.

Chandivali Car Accident: चांदिवलीत हिट अँड रन; मद्यधुंद अवस्थेत महिलेने चौघांना ठोकरले
FDA Food Safety Action: नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई; ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित

नहार अमृत शक्ती परिसरातील रहिवाशांकडून संताप व्यक्त

या भागात होणारी बेदरकार वाहन चालवणूक आणि हिट-अँड-रन सदृश घटनांवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह विरुद्धची कारवाई अधिक कडक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या अपघातामुळे चांदिवली आणि नहार अमृत शक्ती परिसरातील रहिवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

उपचारासाठी खर्चाची कुटुंबीयांकडून मागणी

हा अपघात केवळ निष्काळजीपणा नसून मद्यधुंद अवस्थेत जाणीवपूर्वक केलेला कृत्य (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) असल्यासारखा आहे, त्यामुळे पोलिसांनी आरोपीवर कडक आणि अजामीनपात्र कलमे लावावीत, अशी मागणी जखमी तरुणांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

अपघातात दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून तरुणांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च आणि दुचाकी दुरुस्तीसाठी आर्थिक नुकसानभरपाई आरोपी असलेल्या महिला चालकाकडून वसूल केली जावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news