छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

राजकीय वर्तूळात चर्चेंला उधाण
Maharashtra Politics
छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला Pudhari Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. भूजबळ शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्व्हर ओकवर भेट घेणार आहेत. अचानक छगन भूजबळ शरद पवारांची भेटीला गेल्याने राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे. अद्याप भेटीचे कारण स्पष्ट झालेले नाही. Maharashtra Politics

राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण

मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (दि.१४) बारामती येथे सभेमध्ये शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. या जाहीर टीकेनंतर आज (दि.१५) छगन भूजबळ ताफा घेवून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटीला गेले आहेत. भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भेटीने राजकीय वर्तुळासह सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे.

छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर मिलींद नार्वेकरही शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news