वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याच्या तयारीत

वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याच्या तयारीत
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संकेत पक्षाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे नुकत्याच संपन्न झालेल्या प्रमुख पदाधिकायांच्या बैठकीत दिले. यावेळी युती किंवा आघाडीचा चष्मा काढून स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशच त्यांनी दिले.

गेल्या काही दिवसांत 'आमचं शिवसेनेसोबत जमलं' अशाप्रकारच्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर अँड. आंबेडकर देताना दिसून येतात. मात्र शिवसेनेसोबतदेखील युती होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास भाजप- शिवसेनेच्या मतांचे ध्रुवीकरण है। आंबेडकरांच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरे कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहिल्यास भाजपच्या एकगठ्ठा मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा सरळ फायदा आंबेडकरांना होईल, अशा पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या भावना आहेत…

राज्यभर शिवसेना-भाजपच्या मतांच्या ध्रुवीकरणाचा हाच पॅटर्न चालल्यास वंचितला त्याचा फायदा होण्याची शक्यता काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत बोलून दाखवली. मागील निवडणुकीत वंचितमुळे कांग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा झालेला पराभव आणि यावेळी भाजपपासून दुरावलेला शिवसेनेचा मतदार बघता येणाऱ्या निवडणुका वंचितसाठी संधी असल्याचा सूर या बैठकीतून उमटला. लोकसभेच्या ४८ जागा लढवल्यास जास्तीत जास्त कार्यकत्यांना संधी देता येईल आणि त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत पक्षाला होईल, असाही एक मतप्रवाह पदाधिकाऱ्यांमध्ये होता. त्यामुळे अँड. आंबेडकर 'एकला चलो रे'ची भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा वंचितचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात २००९ आणि २०१४ अशा सलग दोन वेळा भारिप बहुजन महासंघाचा आमदार निवडून आला होता. आता मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या निष्ठावान आमदारांपैकी एक असलेले नितीन देशमुख येथील आमदार आहेत. वंचितची या मतदारसंघावर मजबूत पकड असल्याने कार्यकर्ते या जागेसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे या जागेसाठी तडजोड करायला तयार नसल्याचे समजते. त्यामुळे या जागेवरूनही शिवसेना, वंचित युतीचा पेच फसल्याची खात्रीलायक माहिती आहे.

अल्टिमेटम आणि चिमटा

 इंडिया आघाडीतील प्रवेशावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर सातत्याने टीकास्त्र डागणाऱ्या अॅड. आंबेडकर यांनी काँग्रेसला महार- राष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा लढवण्याचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे शिवसेना युतीवर भाष्य करताना 'आमचं शिवसेनेसोबत लग्न जुळलंय, पण दोन भटजी आडवे येत आहेत,' असे वक्तव्य करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला एकप्रकारे चिमटा काढला आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news