Maharashtra Police Vacancies | राज्य पोलीस दलात तब्बल २८,७३४ पदे रिक्त

Maharashtra Police Vacancies | राज्य पोलीस दलात तब्बल २८,७३४ पदे रिक्त
Maharashtra police
Maharashtra policepudhari photo
Published on
Updated on

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

राज्यात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीसदल तोकडे पडत आहे. सद्यस्थितीत पोलीस शिपाई ते पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल २८ हजार ७३४ पदे रिक्त आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडासह राज्यातील इतर ग्रामीण भागात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी आणि पोलिसांवर असलेला ताण कमी करण्यासाठी ही रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असल्याची माहिती एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

राज्यात मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, मीरा भाईंदर-वसई विरार आणि लातूर, नांदेड ही बारा पोलीस आयुक्तालये असून ३६ पोलीस अधीक्षक कार्यालयांचा समावेश आहे. चार रेल्वे पोलीस आयुक्तालये असून आठ परिक्षेत्र (विशेष पोलीस महासंचालक) कार्यालयांचा समावेश आहे. यापैकी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर आयुक्तालय विभागात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यापासून पोलीस आयुक्तालयातील महत्वाची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस आयुक्त दर्जाची २९ पदे रिक्त आहेत.

दहा वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आता थेट पदोन्नती दिली जात आहे. पोलीस शिपाई ते नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त अशा पध्दतीने पदोन्नती दिली जाते. मात्र अनेक पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक आयुक्त पदांची पदोन्नती नाकारली आहे. तर काहींना सेवाज्येष्ठतेचा फटका बसल्याने पदोन्नती मिळण्याआधीच सेवानिवृत्तीचा निरोप घ्यावा लागला आहे.

दरवर्षी सेवानिवृत्ती, सेवेत असताना निधन झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदांचाही समावेश रिक्त पदांमध्ये झाल्याने रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंजूर पदे आणि नेमणुकीत असलेले कर्मचारी, अधिकारी यांच्यात तफावत आहे.

Maharashtra police
Local Train Incident | धावती लोकल रोखण्याचा प्रयत्न

रिक्त पदे

पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक दर्जा २९ पदे

पोलीस उपअधीक्षक १८५ पदे

पोलीस निरिक्षक ५२१ पदे

सहाय्यक पोलीस निरिक्षक २८७ पदे

पोलीस उपनिरिक्षक २८७८ पदे

सहाय्यक पोली उपनिरिक्षक १५६२ पदे

पोलीस हवालदार, शिपाई २३२७२ पदे

Maharashtra police
MMRDA Metro Passengers - एमएमआरडीए मेट्रोतून ३० कोटी प्रवाशांचा प्रवास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news