Local Train Incident | धावती लोकल रोखण्याचा प्रयत्न

धावती लोकल रोखण्याचा प्रयत्न
Mumbai local train
Mumbai Local Trainpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी धावत्या लोकलसमोर उभे राहून गाडी अडवण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. मात्र, मोटरमनने प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. यातून मोठा गोंधळ उडाला व काही काळ लोकल वाहतुकीवर परिणाम झाला.

रेल्वे सुरक्षा बल आणि सरकारी रेल्वे पोलिसांनी या तरुणास ताब्यात घेतले असून, मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्याने हे कृत केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. हा संपूर्ण थरारक रेल रोको परिसरातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

सिग्नल हिरवा असतानाही लोकल अचानक थांबवावी लागल्याने लोकलमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. होते. पुरुष डब्यातील एका तरुण प्रवाशाने धाडस करून खाली उतरून रूळावर उभ्या तरुणाकडे धाव घेतली. त्याने त्याला रुळांवरून दूर खेचत सुरक्षित ठिकाणी नेले. केवळ मोटरमनच्या सतर्कतेमुळे लोकल रोको करणाऱ्या तरुणाचा जीव वाचला, अशी चर्चा विरार- चर्चगेट उपनगरीय रेल्वे प्रवाशांमध्ये सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news