OBC Fund: अर्थसंकल्पात मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

मंत्रालयात बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक पार पडली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankulePudhari
Published on
Updated on

मुंबई: ओबीसींसाठी अर्थसंकल्पातील मंजूर निधी वित्त विभागाने ओबीसी विभागाला तातडीने द्यावा, अशी तंबी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिली. निधी देण्याचे कायदेशीर बंधन असतानाही अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केला, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

मंत्रालयात बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अतुल सावे, गणेश नाईक उपस्थित होते.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांना जागा उपलब्ध करून देणे, प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम अदा करणे आणि ३६ ओबीसी जातींचा केंद्राच्या यादीत समावेश करणे, अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच ओबीसी महामंडळांच्या निधीचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

Chandrashekhar Bawankule
Mumbai Cooperative Board Election: मुंबई सहकारी बोर्डावर सहकार पॅनेलचे वर्चस्व; सर्व संचालक बिनविरोध

महाज्योतीसह सर्व महामंडळांना प्रत्येकी ३०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र महाज्योतीने १ हजार कोटींची मागणी केली आहे. निधीअभावी कोर्सेस बंद पडल्याची बाब समोर आल्यावर ३०० कोटींचा निधी का कमी पडत आहे, याची कारणमीमांसा उपसमितीसमोर ठेवण्याचे व तो प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पीएचडी फेलोशिप

‘महाज्योती’च्या पीएचडी फेलोशिपचे १२६ डिसेंबरपर्यंत दिले जातील. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार या योजनेसाठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा १ लाख रुपयांवरून थेट ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Chandrashekhar Bawankule
Nasha Mukt Maharashtra: नशामुक्त महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय! अमली पदार्थांचे २०२९ पर्यंत उच्चाटन

आश्रमशाळा

निवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा वाढविण्यासाठी गतवर्षीची ४८ कोटींची बिलेही द्यायची आहेत. यासाठी २०० कोटींची मागणी असून ४ हजार ४२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सर्व आश्रमशाळांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news