Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची भाकरी अडीच वर्षांनी फिरणार

पावसाळी अधिवेशनापर्यंत प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीकडे लक्ष दिले जाणार आहे. मंत्र्यांना यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही समजते.
Eknath Shinde
Eknath ShindeFile Photo
Published on
Updated on

मुंबई: भाजपने मिळवलेल्या यशाचे मुक्तकंठाने कौतुक करतानाच उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल कमालीचे सावध झाले आहेत. संघटना वाढवू न शकणाऱ्या मंत्र्यांना नारळ दिला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनापर्यंत प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीकडे लक्ष दिले जाणार आहे. मंत्र्यांना यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकलांनंतर ज्या मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळाले नाही त्यांना पक्षातील ज्येष्ठ संघटनाचालकांनी यापूर्वीही समज दिली होती. तुमच्या कामगिरीकडे लक्ष आहे, असे सांगण्यात आले होते.

Eknath Shinde
MahaRERA housing project notices: राज्यातील आठ हजार गृहनिर्माण प्रकल्पांवर येऊ शकतात निर्बंध

भाजप विस्तारवादाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने आता सावध पावले टाकली जाणार आहेत. मोठा भाऊ असलेल्या भाजपची घोडदौड कौतुकास्पद आहे. मात्र, त्यामुळे भाजप पुढे काय करेल, याकडेही लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेत व्यक्त करण्यात आले आहे.

Eknath Shinde
Mumbai stranded sailors rescue: तीन जहाजांवर अडकलेल्या 50 खलाशांची तत्काळ सुटका करा; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा लवकरच आढावा घेतला जाईल. पालकमंत्री तसेच संपर्कमंत्री नेमके काय करतात, याकडेही आता लक्ष दिले जाते आहे. अडीच वर्षांनी भाकरी फिरवली जाईल अन्‌‍ ज्यांना मंत्री केले नाही, त्यांना संधी दिली जाईल, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news