MCOCA on beef smugglers: महाराष्ट्रात गोमांस तस्करांना ‘मोका’ लावणार, स्वतंत्र कायदाही आणणार; गृह राज्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra New Law Against Beef Smuggling: गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत घोषणा
MCOCA on beef smugglers
गोमांस तस्करांना ‘मोका’ लावणारpudhari photo
Published on
Updated on

Maharashtra New Law Against Beef Smuggling MCOCA

मुंबई : राज्यात गोमांसाची वारंवार तस्करी करताना आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) लावण्यात येईल. यासंदर्भात आगामी अधिवेशनात गोमांस तस्करीविरोधी स्वतंत्र कायदा आणला जाईल, अशी घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली.

2022 ते 2025 दरम्यान राज्यात गोवंश हत्या, वाहतूक व विक्रीप्रकरणी 2,849 गुन्हे दाखल करण्यात आले असताना 4,677 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, 1,724 टन मांस जप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली.

MCOCA on beef smugglers
Allahabad HC on cow slaughter : ‘गायींना मारणारा नरकात जातो’, ‘गो हत्या बंदी’चा कायदा करा – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीम अहमद

भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी हा विषय उपस्थित केला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदराबादहून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबईच्या दिशेने निर्यातीसाठी घेऊन जात असताना दोन ट्रक कंटेनर पकडले. मे. एशियन फुड्स् मीम अ‍ॅग्रो या कंपनीकडून या गोमांसाची निर्यात होते. याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करून संबंधितांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी भारतीय यांनी केली.

गुन्हे दाखल करून कारवाई सुरू

त्यावर राज्यमंत्री भोयर म्हणाले, पुण्याच्या मौजे कुसगाव येथे 25 मार्च 2025 रोजी सुमारे 57 हजार किलो गोवंशीय मांस दोन मोठ्या कंटेनरमध्ये वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी एशियन फूड कंपनीचे मालक व इतरांनी ई-वे बिल, इनवर्ड्स आदी बनावट कागदपत्रांच्या आधारावर शासनाची फसवणूक केली. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून, संबंधित कंपनीचा परवाना रद्द करण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. याप्रकरणी कंपनीचे दोन मालक आरोपी आहेत. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन जामीन मिळाला आहे, तर दुसर्‍या आरोपीच्या अटकेसाठी प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत तपास करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

MCOCA on beef smugglers
Maharashtra Local Body Elections: निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली, फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार

गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार

समाजहितासाठी कार्य करणार्‍या गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल झाले असतील, तर त्याचा आढावा घेऊन गुन्हे मागे घेण्याच्या द़ृष्टीनेही विचार केला जाईल, अशी ग्वाही भोयर यांनी परिषदेत दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news