

काँग्रेसने महापालिकेसाठी स्टार प्रचारकांची यादी आज जाही केली आहे. यावरुन आता भाजपाने टीकेचे हत्यार उपसले असून. काँग्रेसचा मुस्लीम लीगच्या वाटेवर जात आहे अशी थेट टीका भाजपाचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. महापालिका निवडणूकांचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. आता बन यांनी काँग्रेसला स्टार प्रचारकांच्या यादीवरुन टीकेचे लक्ष्य केले आहे.
काँग्रेसची धर्माधारित व्होटबँक नीती उघडी
पुढे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की काँग्रेसच महाराष्ट्रात हिंदूविरोधी अजेंडा सुरू आहे. पण महाराष्ट्र फाळणीची प्रयोगशाळा नाही; महापालिका निवडणुकीत काँग्रेसला जनता उत्तर देईल असेही बन यांनी म्हटले आहे. काँग्रेसची खरी ओळख आता लपून राहिलेली नाही. महापालिका निवडणुकीतील ४० स्टार प्रचारकांपैकी १० नावं एका विशिष्ट धर्मातील असणं हा योगायोग नाही, तर उघड उघड धर्माधारित व्होटबँक राजकारणाचा अजेंडा आहे.
मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल
स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी काँग्रेस आज मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारण करत आहे. विकास, कामगिरी आणि नेतृत्व शून्य झाल्यावर काँग्रेसला आता हिंदूविरोधी अजेंडा राबवावा लागतोय. पण महाराष्ट्र ही फाळणीची प्रयोगशाळा नाही. महापालिका निवडणुकीत जनता यांना योग्य उत्तर देणारच असा ठाम विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला आहे.
कोण आहेत काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत
मुहम्मद अझरुद्दिन, आरिफ नसिम खान, इम्रान प्रतापगढी, राज बब्बर, अनिस अहेमद, हुसेन दलवाई, साजिद खान पठाण, मुझ्झफर हुसेन, एम. एम. शेख, वझाहत मिर्झा यांची स्टार प्रचारकाच्या यादीत नावे घातली आहेत. हे सर्वजण महाराष्ट्रातील महापालिका निवडणूकीत विविध शहरात प्रचार सभा घेणार आहेत. यावरुन भाजपाने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. हिंदूविरोधी आघाडी उघडून आपली व्हॉट बँक तयार करायची आहे. अशी टीका बन यांनी केली.