Maharashtra Rain Update | पाऊस पडला तरी पेरणीची घाई नको

Farmers Sowing Warning | सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन; मान्सूनची गती मंदावणार?
Farmer Advisory Maharashtra
Kharif Crop Sowing(File Photo)
Published on
Updated on

Farmer Advisory Maharashtra

मुंबई : यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाल्याने २५ मे रोजीच दक्षिण कोकणात तो दाखल झाला आहे. तब्बल दहा दिवस आधी पावसाने राज्यात वर्दी दिली आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसात मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असून राज्यातील हवामानात लबवकरच मोठे बदल दिसून येणार आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात रविवारी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने रविवारी केले आहे.

ज्यातील अनेक भागात मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल, अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील.

Farmer Advisory Maharashtra
Maharashtra Farmer News | खरिपासाठी अडीच लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

सध्याच्या अंदाजानुसार २७ मे पासून राज्यातील हवामान हळूहळू होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढदेखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

Farmer Advisory Maharashtra
Farmers News | जिल्ह्यात ५२८ हे. क्षेत्रावरील शेती उद्ध्वस्त

हवामान कोरडे होणार?

या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. त्यामुळे आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news