Maharashtra MLC Elections : मिलिंद नार्वेकर आणि सदाभाऊ खोत विजयी

शेकापाच्या जयंत पाटलांचा पराभव
Maharashtra MLC Elections 2024 News Updates
मिलिंद नार्वेकर व सदाभाऊ खोत हे विजयी झालेFile Photo

मिलिंद नार्वेकर आणि सदाभाऊ खोत विजयी

ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत विजयी झाले असून शेकापाच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. मिलिंद नार्वेकर यांना २५ मते मिळाली.

विजयानंतर भाजपच्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया...

माझं राजकारण हे सर्वसामान्यांसाठी आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या पंकजा मुंडे यांनी व्यक्‍त केली. लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्यासाठी विधानपरिषदेतील विजय महत्‍वाचा ठरणार आहे.

दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू...

या निकालाने चर्चांना पूर्णविराम लागला : अजित पवार

आमच्या प्रयत्‍नांना चांगल यश मिळालं. सगळे उमेदवार निवडून यायला हरकत नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्‍त केली.

मिलिंद नार्वेकरांना एका मताची गरज, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू

ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना विजयासाठी एका मताची गरज

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय

भाजपच्या पंकजा मुंडे विजयी

विधानपरिषदेत भाजपचे तीन उमेदवार विजयी

कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांचा विजय

शिंदे गटाचे दोन उमेदवार निवडून आले. यामध्ये कृपाल तुमाणे आणि भावना गवळी हे विजयी झाले.

अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी...

अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जेही विजयी झाले.

महायुतीचे भाजपचे योगेश टिळेकर विजयी...

२३ मतांचा कोटा पूर्ण करून भाजपचे योगेश टिळेकर हे विजयी झाले आहेत.

मतमाेजणीची आकडेवाडी

  • भाजपच्या गोरखेंना २२ मतं

  • राष्‍ट्रवादीच्या गर्जेंना २४ मतं

  • भावना गवळी यांना २४ मतं

  • योगेश टिळेकरांना २६ मतं : विजयी

  • राजेश विटेकरांना १६ मते मिळाली.

  • परिणय फुकेंना ११ मतं

  • कृपाल तुमानेंना २५ मतं

  • प्रज्ञा सातव २५ मते घेऊन

  • मिलिंद नार्वेकरांना २२ मतं

  • भाजपाच्या पंकजा मुंडे यांना २६ मतं मिळाली

  • शेकापच्या जयंत पाटील यांना १२ मतं

  • सदाभाऊ खोत १० मतं मिळाली

  • समान पसंती दिल्‍याने एक मत बाद

  • भावना गवळी १० मतं

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतमोजणीला सुरूवात

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतमोजणीला सुरूवात झालेली आहे. विधानपरिषदेसाठी १०० टक्‍के मतदान पूर्ण झाले आहे. २७४ आमदारांचं मतदान पूर्ण झाले आहे. विजयासाठी २३ मतांचा कोटा लागणार असून कुणाची विकेट पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहाजीबापू पाटील आजारी, तरीही मतदानासाठी विधीमंडळात दाखल

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजारी असतानाही शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल झाले.

काँग्रेसच्या सर्व ३७ आमदारांनी केले मतदान

काँग्रेसच्या सर्व ३७ आमदारांनी मतदान केले. दरम्यान, आपले आमदार वाचवण्यासाठी महायुती प्रयत्न करत आहे. मात्र, पैशाच्या जोरावर नेहमीच सत्ता मिळवता येत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील- मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विधिमंडळात जाऊन मतदान केले. याचे फोटो स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट केले आहेत. ''यावेळी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच इतर सदस्यांशी यानिमित्ताने संवादही साधला. महायुतीचे सर्व उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील याची मला पूर्ण खात्री आहे.'' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

शायरी म्हणत काँग्रेस आमदार गोरंट्याल यांनी केले मतदान

"रातभर दिल की धडकने जारी रहती है, सोते नहीं है हम जिम्मेदारी रहती है," ही शायरी म्हणत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले मतदान

विधान परिषद निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

उद्वव ठाकरेंची मोठी खेळी

काँग्रेसच्या मतदानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार पाच-पाचच्या गटाने मतदान करणार

काँग्रेसच्या ३०आमदारांचे मतदान

विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसच्या ३० आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मुख्यमंत्री शिंदेंनी केले मतदान, आतापर्यंत २०३ आमदारांचे मतदान

दुपारी १२ वाजेपर्यंत २०३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मतदान केले.

'हे' उमेदवार डेंजर झोनमध्ये

भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शेकाप यांच्या उमेदवारांपैकी एक उमेदवार पडेल, अशी चर्चा रंगली आहे. भाजपचे परिणय फुके, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे शिवाजीराव गर्जे किंवा शेकापचे जयंत पाटील यांच्यापैकी एकाच्या पराभवाची शक्यता व्यक्त केली जात असल्याचे समजते. त्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. 

निकोले आणि गडाख ठाकरेंसोबत

आमदार विनोद निकोले आणि शंकरराव गडाख ठाकरे यांच्यासोबत राहणार आहेत. त्यामुळे ते मिलिंद नार्वेकरांना मतदान करणार असल्याचे समजते.

काँग्रेसची ९ मते फुटणार हा जावईशोध कोणी लावला?- वडेट्टीवार

काँग्रेसची ९ मते फुटणार हा जावईशोध कोणी लावला? असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड विधानभवनात पोहोचले

भाजपचे आमदार गणपत गायकवाड विधानभवनात पोहोचले. गणपत गायकवाड यांच्या मतदानावर काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आक्षेप आहे. गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता.

एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले आहेत.

जाणून घ्या पक्षनिहाय संख्याबळ

महायुती : १९६

भाजप - १०३+७ एकूण : ११०

५ अपक्ष (रवी राणा, प्रकाश आवाडे, विनोद अग्रवाल, महेश बालदी, राजेंद्र राऊत)

रत्नाकर गुट्टे (रासप) आणि विनय कोरे (जनसुराज्य)

शिंदे गट - ३८+६ अपक्ष : ४४

६ अपक्ष (आशिष जैस्वाल, मंजुळा गावित, राजेंद्र यड्रावकर, गीता जैन, नरेंद्र भोंडेकर आणि किशोर जोरगेवार)

अजित पवार गट - ४०+२ अपक्ष : ४२

२ अपक्ष (संजय शिंदे, चंद्रकांत पाटील)

महाविकास आघाडी : ६५

काँग्रेस - ३७ ठाकरे गट - १५+१ एकूण : १६ शरद पवार गट - १२

काँग्रेसच्या आमदारांच्या मतदानाला सुरुवात

काँग्रेसच्या आमदारांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून अस्लम शेख यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी पुन्हा डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.

ठाकरेंचे आमदार विधानभवनाकडे रवाना

अकरा जागांसाठी महायुतीत भाजप ५, शिवसेना शिंदे गट २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ असे ९ उमेदवार रिंगणात आहेत; तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना आणि शेकाप यांनी प्रत्येकी एक असे एकूण तीन उमेदवार उभे केले आहेत.

११ वाजेपर्यंत १२४ आमदारांनी केले मतदान

११ वाजेपर्यंत १२४ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

आमदारांआधी उद्धव ठाकरे विधानभवनात पोहोचले.

आमदारांआधी उद्धव ठाकरे विधानभवनात पोहोचले. विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव केली जात आहे.

MLC Elections : काँग्रेसची मते महायुतीच्या पारड्यात? महायुतीचा दणदणीत विजय

पुढारी वृत्तसेवा : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत महायुतीचाच डंका वाजला.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेच्या भावना गवळी (२४ मते) आणि कृपाल तुमाने (२५ मते) यांचा विजय झाला. शिवसेनेकडे ४६ मते होती. त्यात आणखी ३ मते शिवसेना उमेदवारांना मिळाली.

महायुतीतील भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांना प्रत्येकी २६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांना २३ मते आणि शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ मते पक्की होती. त्यात त्यांना ५ अतिरिक्त मते मिळाली.

काँग्रेसकडे ३२ मते होती. त्यातील २५ मते प्रज्ञा सातव यांना मिळाली. काँग्रेसची पहिल्या पसंतीची ७ मते फुटल्याचा संशय आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. उबाठा गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात २३ मतांसह नार्वेकर यांचा विजय झाला तर जयंत पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे उबाठाचे नार्वेकर हे दुसऱ्या पंसतीच्या मतांनी निवडून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news