Mathadi Workers Weight Limit : बाजार समित्यांमध्ये पन्नास किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी उचलण्यास बंदी!

हमाली व माथाडी कामगारांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून ५० किलोपेक्षा जास्त वजन उचलण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय
Mathadi Workers Weight Limit
Mathadi Workers Weight Limitpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील माथाडी कामगारांच्या आरोग्याची कामगार विभागाने दखल घेतली असून यापुढे कोणत्याही बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाच्या किंवा इतर मालाच्या गोण्यांची हाताळणी अथवा चढ-उतार करून घेता येणार नाही.

यासंदर्भात कामगार विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्व्हेन्शन क्र. १२७ नुसार हमाली व माथाडी कामगारांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून ५० किलोपेक्षा जास्त वजन उचलण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार, पणन संचालनालय आणि कामगार आयुक्तांच्या विविध परिपत्रकांनंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणीत अडचणी येत होत्या.

Mathadi Workers Weight Limit
Mumbai Mill Workers Housing Scheme : गिरणी कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आता ३ एफएसआय

या पार्श्वभूमीवर, कामगार मंत्री आणि पणन मंत्री यांच्या संयुक्त उपस्थितीत व्यापारी संघटना, कामगार संघटना, पणन विभाग व माथाडी मंडळांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता ५० किलो वजन मर्यादेची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासकीय परिपत्रकात असलेले प्रमुख मुद्दे

  • पन्नास किलोची मर्यादा : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा, बटाटा व इतर शेतमालाच्या ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्यांची/पिशव्यांची चढ-उतार करण्यास पूर्णपणे बंदी.

  • शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती: गोणीची वजन मर्यादा ५० किलोपर्यंतच ठेवावी, यासाठी माथाडी मंडळ आणि बाजार समित्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी.

  • कडक संनियंत्रण व अहवाल: सह आयुक्त (माथाडी) व संबंधित माथाडी मंडळांच्या अध्यक्षांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीवर स्वतः लक्ष ठेवावे आणि नियमित अहवाल शासनाला सादर करावा.

Mathadi Workers Weight Limit
Tulja Bhavani Temple : तुळजापरात दर्शन रांगेत भाविकाकडे आढळले पिस्तूल

कामगार वर्गात आनंदाचे वातावरण

अतिवजनाच्या गोण्या उचलल्यामुळे अनेक माथाडी कामगारांना पाठीचे, मणक्याचे व इतर गंभीर आजार जडत होते. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो माथाडी व हमाल कामगारांना मोठा आरोग्यदायी दिलासा मिळाला असून, सर्व माथाडी कामगार संघटनांनी या परिपत्रकाचे स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news