Police fine protest : पोलिसांनी दंड आकारल्याने चक्क झाडावर चढून आंदोलन

तब्बल दोन तास पोलिसांना वेठीस धरले
Police fine protest
पोलिसांनी दंड आकारल्याने चक्क झाडावर चढून आंदोलनpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क विधान भवनाबाहेरील झाडावर चढून तब्बल दोन तास अनोखे आंदोलन केले. वाहतूक पोलिसांनी दंड केल्याने मी जीव देण्यासाठी झाडावर चढलो, असे तो सांगत होता. अखेर कफ परेड पोलिसांनी समजूत काढून त्याला खाली उतरवले. संपत चोरमले (32) असे या तरूणाचे नाव असूनतो नशेत असल्याने वायफळ बडबड करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.

विधान भवनाबाहेर शनिवारी सकाळी अचानक गोंधळ सुरू झाला. सकाळी 10 वाजता एक तरूण झाडावर चढून बसला होता. मी उडी मारून जीव देईन असे तो वारंवार सांगत होता. त्याला झाडावर चढलेले पाहून बघ्यांची गर्दी जमली. तो खाली उतरायला तयार नव्हता. गर्दी बघून त्याला आणखीनच स्फुरण चढले.

Police fine protest
Chhath Puja 2025 : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची छठपूजा जोरात

विधान भवनाबाहेर शनिवारी सकाळी अचानक गोंधळ सुरू झाला. सकाळी 10 वाजता एक तरूण झाडावर चढून बसला होता. मी उडी मारून जीव देईन असे तो वारंवार सांगत होता. त्याला झाडावर चढलेले पाहून बघ्यांची गर्दी जमली. तो खाली उतरायला तयार नव्हता. गर्दी बघून त्याला आणखीनच स्फुरण चढले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस त्याला खाली येण्यासाठी विनवणी करीत होते. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस झाडावर चढू लागताच तो उडी मारण्याची धमकी देत होता.

Police fine protest
BMC Water Tax: मुंबईकरांना दिलासा! निवडणुकीमुळे पाणीपट्टीवाढीचा निर्णय लांबणीवर

शेवटी कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड त्याच्या कलाने घेत झाडावर चढले. त्याच्याशी प्रेमाने बोलू लागले. तुझी अडचण दूर करू, तुझी मागणी पूर्ण करू असे सांगत त्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरिही त्याची वायफळ बडबड सुरूच होती. माझ्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली, असे तो सांगत होता. मात्र गायकवाड यांनी चातुर्याने समजूत घालून त्याला खाली आणले.

आंदोलन करणारा संपत चोरमले विक्षिप्त आहे. तो पदपथावरच राहतो आणि खासगी ॲप आधारित टॅक्सी चालवतो. त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती. आम्ही टॅक्सीच्या मालकाला बोलावले असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहोत.

योगेश चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news