Majestic Energy Project: मॅजेस्टिक योजनेच्या अंमलबजावणीला मंजुरी

जागतिक बँकेच्या सहकार्याने वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण; अपारंपरिक ऊर्जेला मुख्य प्रवाहाशी जोडणार
Majestic Energy Project
Majestic Energy ProjectFile Photo
Published on
Updated on

मुंबई: राज्यातील वीज यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जेला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी मॅजेस्टिक या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेतले जाणार आहे. सुमारे 12 हजार 303 कोटी इतक्या खर्चाच्या या प्रकल्पातून महाराष्ट्रातील हरित ऊर्जेचा टक्का 50 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात विजेची मागणी वार्षिक 8 ते 10 टक्के या विक्रमी दराने वाढली आहे. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत होणारी औद्योगिक गुंतवणूक, पायाभूत सुविधांचे महाप्रकल्प आणि कृषी क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता अखंडित, परवडणारा आणि विश्वासार्ह वीजपुरवठा करणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान होते.

Majestic Energy Project
Police Transfers: वादग्रस्त दत्ता कराळे यांची उचलबांगडी; राज्य मानवी हक्क आयोगात बदली

या पार्श्वभूमीवर, पारंपरिक स्रोतांवर आधारित वीज निर्मितीऐवजी सौर आणि पवन ऊर्जेसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा मुख्य ग्रीडमध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश करून संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी मॅजेस्टिक प्रकल्प आखण्यात आला आहे.

या योजनेस व त्याच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही राज्य वीज कंपन्या संयुक्तपणे या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहेत.

हरित ऊर्जेची निर्मिती केल्यानंतर ती साठवून ठेवणे आणि मागणी वाढेल तेव्हा ती ग्रीडमध्ये सोडणे, यासाठी अत्याधुनिक साठवणूक तंत्रज्ञानाची गरज असते. मॅजेस्टिक योजनेच्या माध्यमातून राज्यभरात अशा प्रकारची अद्ययावत साठवणूक केंद्रे उभारली जाणार आहेत. यामुळे विजेची टंचाई असतानाच्या काळात ग्राहकांना अखंडित पुरवठा करणे शक्य होणार असून, भारनियमनाची समस्या कायमची संपुष्टात येईल.

Majestic Energy Project
School Relocation: शाळांच्या स्थलांतरासाठी नवे धोरण जाहीर; भौतिक सुविधांचा दर्जा उंचावणार

उद्योग आणि कृषी क्षेत्राला हक्काची वीज मिळाल्यास राज्याचा विकास दर अधिक गतीने वाढेल. जागतिक बँकेच्या या अर्थसहाय्यामुळे महावितरण आणि महापारेषणच्या पायाभूत वाहिन्यांचे जाळे सुधारेल, वीज गळती कमी होईल आणि परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक पसंतीचे राज्य बनेल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news