Maharashtra Library Membership: डिजिटल युगात घटती सभासद संख्या; तरीही ग्रंथालयांत पुस्तकांची देवाणघेवाण पाच कोटींवर

कोरोनानंतर वाचन संस्कृतीत बदल; सभासद 26 लाखांवरून 19 लाखांवर, मात्र पुस्तक व्यवहारात लक्षणीय वाढ
Maharashtra Library Membership
Maharashtra Library MembershipPudhari
Published on
Updated on

मुंबई : अनुपमा गुंडे

कोरोनानंतर डिजीटल आणि समाज माध्यमांचा प्रसार वेगाने झाल्यामुळे हातात पुस्तक घेवून वाचणाऱ्यांच्या हातातील पुस्तक कधी गळून पडले याचा पत्ता लागला नाही. ग्रंथालयांच्या सभासदांची संख्या तीन वर्षांत 26 लाखांवरून 19 लाखांवर आली. असे असले तरी ग्रंथालयांतील पुस्तक देवाण घेवाण मात्र लक्षणीय वाढली आहे. ही संख्या 2 कोटींवरून पाच कोटींवर गेली आहे. ग्रंथालय संचालनालयाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Library Membership
Mumbai Air Quality Action BMC: मुंबईतील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेची कठोर कारवाई; ९३ ठिकाणी कामबंदी नोटीस

वाचन संस्कृती घटत असून ग्रंथालये बंद पडत आहेत, हे श्वाश्वत सत्य आहे. अनेक ग्रंथालयांमध्ये वाचणारे वाचक हे पन्नाशीच्या पुढचेच आहेत. त्या वाचकांची सभासद संख्या ग्रंथालयामधून वेगाने घटत आहे. मात्र स्पर्धा परीक्षा, उच्च पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी विविध साहित्य प्रकार, संदर्भ ग्रंथांची देवाणघेवाण ग्रंथालयांमध्ये करीत असल्याचेे आशादायी चित्र आहे.

Maharashtra Library Membership
Mumbai PAP Housing Scheme: प्रकल्पबाधितांसाठी ३४,१२९ पीएपी सदनिका; महापालिकेच्या अर्थसंकल्पात ८९० कोटींची तरतूद

तीन वर्षांतील ग्रंथालयांमधील सभासद संख्या आणि पुस्तकांची देवघेव

वर्ष सभासद संख्या पुस्तकांची देवघेव

2022 -23 : 26,39,538 2,94,00,053

2024-25 : 18, 86,613 4,31,70,273

2025-26 : 19,16,134 5,26,95,000

Maharashtra Library Membership
42 Years Absconding Arrested: ४२ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; भायखळा पोलिसांची मोठी कामगिरी

ग्रंथालयांची आज्ञावली आता डिजीटल होते आहे. त्यामुळे कोणत्या ग्रंथालयात कोणते पुस्तक आहे, याची माहिती ऑनलाईन मिळते आहे. तसेच प्रसंगानुरूप एखादे विशिष्ट साहित्य वाचण्याकडेही कल वाढतो आहे. त्यामुळे संबंधित ग्रंथालयात जावून तत्कालिक सभासदत्व मिळून वाचक वाचत आहेत. आता लवकरच सर्व अ दर्जाची ग्रंथालये डिजीटल माध्यमातून जोडली जाणार असल्याने त्याचा फायदा ग्रंथालयांना होईल अशी आशा आहे.

अशोक गाडेकर, संचालक, ग्रंथालय संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news