Mumbai Air Quality Action BMC: मुंबईतील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेची कठोर कारवाई; ९३ ठिकाणी कामबंदी नोटीस

बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून फेब्रुवारीत १,०८२ तपासण्या; १३५ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस
Mumbai Air Pollution
Mumbai Air PollutionPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण व हवामान बदल विभाग तसेच प्रशासकीय विभागनिहाय (वॉर्ड) यांनी फेब्रुवारी २०२६ या महिन्यात व्यापक आणि कठोर कारवाई केली. दिनांक २ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई महानगरातील विविध प्रभागांमध्ये एकूण १,०८२ ठिकाणी तपासणी करण्यात आली. यापैकी १३५ बांधकामांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच ९३ बांधकामांना काम थांबविण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Mumbai Air Pollution
Mumbai PAP Housing Scheme: प्रकल्पबाधितांसाठी ३४,१२९ पीएपी सदनिका; महापालिकेच्या अर्थसंकल्पात ८९० कोटींची तरतूद

रस्त्यांची सखोल स्वच्छता :- 

हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने सार्वजनिक रस्ते आणि इतर ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवली आहे. पाण्याच्या टँकरद्वारे १,४५४.०९ किलोमीटर अंतराएवढ्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच ६८४.८ किलोमीटर अंतरावरील रस्त्यांवर मिस्टिंग मशिन्सचा वापर करण्यात आला. 

Mumbai Air Pollution
42 Years Absconding Arrested: ४२ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; भायखळा पोलिसांची मोठी कामगिरी

पर्यावरणाचे संवर्धन साधण्यासाठी उपाययोजना :-

पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केवळ दंडात्मक नव्हे तर प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. हवेची गुणवत्ता आरोग्यदायी ठेवणे आणि पर्यावरण संवर्धन साधणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news