Maharashtra Politics: शिंदे शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर?

पक्षात डझनभर नेते इच्छुक असताना शिंदे यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेना कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिल्याचे समजते.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेकडून दोन चेहऱ्यांना संधी मिळणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धक्कातंत्राचा वापर करण्याची चिन्हे दिसत आहेत.

Maharashtra Politics
Paneer Labeling Rule: पनीर कशाचे खाताय? ‘दुधापासूनचे पनीर‌’ असा स्पष्ट उल्लेख मेनूवर करण्याचे फर्मान

पक्षात डझनभर नेते इच्छुक असताना शिंदे यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेना कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिल्याचे समजते. येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेना आमदारांचे संख्याबळ पाहता त्यांचे दोन उमेदवार विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात.

Maharashtra Politics
Women Reservation Bill : महिला आरक्षणासाठी जनमताच्या रेट्याने विरोधकांना गुडघ्यावर आणू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी ही नावे चर्चेत आहेत. गोऱ्हे यांची वर्णी निश्चित मानली जात असली तरी दुसऱ्या नावाबाबत शिंदे पक्षातील इच्छुकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news