Maharashtra ITI Admission: आयटीआयच्या 7 हजार जागा वाढल्या; सर्वाधिक वाढ पुणे विभागात

राज्यभरात एकूण 7 हजार 4 जागांची वाढ झाली असून पुणे विभागात सर्वाधिक 2 हजार 416 जागांची वाढ झाली आहे.
ITI Admission
ITI AdmissionPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश क्षमतेत यंदा वाढ झाली असून 2025-26 मधील 1 लाख 50 हजार 660 जागांच्या तुलनेत 2026-27 मध्ये प्रवेश क्षमता 1 लाख 57 हजार 664 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यभरात एकूण 7 हजार 4 जागांची वाढ झाली असून पुणे विभागात सर्वाधिक 2 हजार 416 जागांची वाढ झाली आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेला 21 मेपासून प्रारंभ होणार आहे. यंदा खासगी आयटीआय संस्थांमध्ये वाढलेल्या प्रवेश क्षमतेमुळे एकूण जागांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ITI Admission
Chandrashekhar Bawankule News: घरे व शेत शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना; चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

पुणे विभागानंतर नागपूर विभागात 1 हजार 948, तर नाशिक विभागात 1 हजार 900 जागांची वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 636, अमरावती विभागात 80 आणि मुंबई विभागात 24 जागांची वाढ झाली आहे.

राज्यात यंदा शासकीय आयटीआय संस्थांची संख्या 418 इतकी कायम असली, तरी खासगी आयटीआय संस्थांमध्ये एका संस्थेची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात एकूण 1 हजार 3 आयटीआय संस्था होत्या. यंदा ही संख्या 1 हजार 4 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी राज्यातील सुमारे 1 लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. यामध्ये 1 लाख 8 हजार 233 मुले आणि 22 हजार 512 मुलींचा समावेश होता.

ITI Admission
Fishing Ban: 1 जूनपासून समुद्रात मासेमारीला ‌‘ब्रेक‌’; 61 दिवस यंत्रचलित नौकांवर बंदी

शासकीय आयटीआयमध्ये 70 हजार 271 मुले आणि 19 हजार 338 मुलींनी प्रवेश घेतला होता. तर खासगी आयटीआयमध्ये 37 हजार 961 मुले आणि 2 हजार 678 मुलींनी प्रवेश घेतला होता. विभागनिहाय प्रवेशामध्ये नाशिक विभाग आघाडीवर राहिला होता. नाशिक विभागात 25 हजार 285, पुणे विभागात 23 हजार 985, तर नागपूर विभागात 23 हजार 592 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. लोकप्रिय ट्रेडमध्ये इलेक्ट्रीशियन या अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती मिळाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news