Maharashtra Interim Budget 2024 | ‍‍वारकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा! प्रति दिंडी २० हजार रुपये देणार

मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळ स्थापन करणार
Maharashtra Interim Budget 2024
अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.२८) राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. X

पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.२८) राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Interim Budget 2024) सादर करत आहेत. त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच प्रति दिंडी २० रुपये देण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

'वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करणार'

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल....म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. निर्मल वारीसाठी ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी दिला जाईल. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. या वर्षीपासून प्रति दिंडी २० हजार रुपये निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Interim Budget 2024
Maharashtra Interim Budget 2024 Live|महिलांसाठी मुख्यमंत्री 'अन्नपूर्णा' योजनेची घोषणा

माझी लाडकी बहीण योजना

अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या या योजनेत महिलांना प्रति महिना १५०० रुपये मिळणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी १० लाख युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणाही राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थीला दरमहा १० हजार रुपये विद्या वेतन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घोषणांचा पाऊस

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि तोंडावर असलेली विधानसभा निवडणूक पाहता शुक्रवारी (२८ जून) अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला. १४ वी विधानसभा नोव्हेंबरमध्ये भंग पावणार आहे. गुरुवारपासून सुरू झालेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे महायुती सरकारचे शेवटचे अधिवेशन असेल. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार सन २०२४-२०२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. येत्या दोन-अडीच महिन्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात लोकसभा निवडणुकीत दुरावलेल्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news