Maharashtra IAS Transfers: अश्विन मुद्गल सिडकोचे व्‍यवस्थापकीय संचालक

विजय सिंघल धारावीचे विशेष कार्यकारी अधिकारी; अश्विनी जोशी एमएमआडीएच्या अतिरिक्त आयुक्त
Maharashtra IAS Transfers
Maharashtra IAS TransfersPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्य सरकारने मंगळवारी बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार, सिडकोच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर एमएमआरडीचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पदावर असलेले विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पद अश्विनी जोशी यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदावर वर्णी लागली आहे.

Maharashtra IAS Transfers
Mumbai Water Cut: मुंबईत औद्योगिक व व्यावसायिक पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

दिपेंद्र सिंह कुशवाह यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची सचिव (वने), महसूल व वन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra IAS Transfers
Drinking Water Policy: राज्यासाठी नवे पाणी धोरण; ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

डॉ. कादंबरी बलकवडे यांची उद्योग संचालनालयात विकास आयु्क्त (उद्योग) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील संजय काटकर यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्त (कुटुंब कल्याण) पदी नियुक्ती झाली आहे. तर केंद्रिय प्रतिनियुक्तीवरुन राज्य सरकारकडे रूजू झालेल्या प्राजक्ता वर्मा यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यासोबतच, किनवट प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्रा दोनथुला यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. तर, अनय नावंदर, प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा यांची बदली अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

याशिवाय, जालन्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांची किनवट प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच, लघिमा तिवारी यांची तळोदा सहाय्यक जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news