Mumbai Health News: आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवा

सरकारी आरोग्य संस्थांमध्ये चादरी, बेडशीट, उशांचे कव्हर, रुग्णांचे कपडे अस्वच्छ असल्याच्या तक्रारी वर्षानुवर्षे सुरू आहेत.
Mumbai Health News:
मुंबई : यांत्रिक वस्त्रधुलाई सेवेचा शुभारंभ आरोग्य भवन येथून करण्यात आला.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मुंबई : सरकारी आरोग्य संस्थांमध्ये चादरी, बेडशीट, उशांचे कव्हर, रुग्णांचे कपडे अस्वच्छ असल्याच्या तक्रारी वर्षानुवर्षे सुरू आहेत. हजारो कपडे दररोज धोब्यांकडून धुवून घेणे शक्य होत नसल्याने त्याला पर्याय म्हणून आता राज्यातील 593 शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि सेवा देण्यासाठी यांत्रिक पध्दतीने कपडे धुलाई सेवा सुरू केली आहे.

आरोग्य भवन येथून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील 20 जिल्हा रुग्णालये, 8 सामान्य रुग्णालये, 105 उपजिल्हा रुग्णालये, 378 ग्रामीण रुग्णालये, 22 महिला रुग्णालये आणि 60 ट्रॉमा केअर युनिट्स अशा एकूण 593 आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्रधुलाईद्वारे रुग्णसेवेची गुणवत्ता उंचावली जाणार आहे.

Mumbai Health News:
Mumbai New Projects | नवे प्रकल्प जगणे करतील सोपे!

या प्रकल्पाची अंमलबजावणी बाह्य खासगी संस्थेमार्फत करण्यात येत असून, संपूर्ण राज्यातील लिनन गोळा करणे, प्रतवारी करणे, निर्जंतुकीकरण करणे व वितरण करणे हे सर्व काम यांत्रिक पद्धतीने केले जाणार आहे. त्यामुळे संक्रमणजन्य आजारांचा धोका कमी होणार आहे.

Mumbai Health News:
Mumbai News : राणीबागेतील सुसर, मगरींना मिळणार स्वच्छ हवा

असा असेल प्रकल्प

या प्रकल्पांतर्गत सरकारी आरोग्य संस्थांतील बेडशीट, उशांचे कव्हर, ब्लँकेट, रुग्णांचे आणि कर्मचाऱ्यांचे गणवेश, पडदे, टॉवेल आदी वस्त्रांची निर्जंतुक धुलाई पूर्णतः यांत्रिक पद्धतीने केली जाणार आहे. बॅरिअर वॉशिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून मानवी हस्तक्षेपाशिवाय कपडे धुतले जातील. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाला संक्रमणमुक्त आणि स्वच्छ लिनन उपलब्ध होईल. सेवेच्या सुसूत्रता आणि कार्यक्षमतेसाठी आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट्स वापरण्याची प्रणाली लागू करण्यात आली आहे. यात सोमवार व गुरुवार पांढरा, मंगळवार आणि शुक्रवार हिरवा तसेच बुधवार आणि शनिवार गुलाबी रंगाच्या बेडशिट्स रुग्णालयात वापरण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news