Maharashtra Health Budget: उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दरे गावी निसर्गोपचार केंद्र; आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन होणार; ग्रामीण भागासाठी 4,500 कोटींची ‘प्रगती योजना’ जाहीर
उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदेFile Photo
Published on
Updated on

शहरी आरोग्य आयुक्तालयास मान्यता

ग्रामीण भागासाठी 4 हजार 500 कोटींची प्रगती योजना

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या दरे या गावाच्या परिसरात आता निसर्गोपचार केंद्र उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात तशी घोषणा केली आणि विधानसभेत हास्याची लकेर उमटली. आरोग्य क्षेत्रातील घोषणा करताना शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना केली जाणार आहे. तसेच कर्करोग, मधुमेह व हृदयविकारासारख्या आजारांच्या लवकर निदानासाठी 4 हजार 500 कोटींची ‌‘प्रगती योजना‌’ही प्रस्तावित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे
Pune Growth Hub Development: जागतिक क्षमता केंद्रासाठी पुण्याला सर्वाधिक पसंती; विकास प्रकल्पांना अर्थसंकल्पात गती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात आरोग्य क्षेत्राचा विशेष उल्लेख केला. दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र, तर मुंबई महानगर परिसरात सर्वांगीण आरोग्य आणि वेलनेसचे जागतिक केंद्र उभारण्याची घोषणा त्यांनी केली. यासोबतच राज्यातील 29 महापालिका, 247 नगरपालिका, 147 नगर पंचायतींमध्ये आरोग्य विभागाच्या सर्व गुणवत्तापूर्ण सुविधांसाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर आशियाई विकास बँकेच्या मदतीतून ग्रामीण भागासाठी 4 हजार 500 कोटींची प्रगती योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे
Mumbai Startup Innovation Hub: मुंबईत जागतिक दर्जाचे स्टार्टअप इनोव्हेशन हब; अर्थव्यवस्था 300 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा संकल्प

आरोग्य क्षेत्रासाठी अन्य घोषणा

राज्यात 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, 11 महाविद्यालयांची कामे विविध टप्प्यांवर.

महात्मा फुले जनारोग्य योजना : उपचारांची संख्या 1,356 वरून 2,399, रुग्णालयांची संख्या 1,792 वरून 4,537 तसेच 9 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी 22 लाखांपर्यंतचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीतून करण्यास मान्यता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news