11th admission : अकरावीच्या विशेष फेरीला ७ जुलैपर्यंत मुदतवाढ

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाचा निर्णय
11th admission
अकरावीच्या विशेष फेरीला ७ जुलैपर्यंत मुदतवाढpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ साठी प्रवेश निश्चित करण्याची मुदत वाढविली आहे. आता विद्यार्थ्यांना ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २२ लाख २० हजार ४२६ जागा उपलब्ध असून त्यापैकी आतापर्यंत ९ लाख ७५ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अजूनही १२ लाख ४५ हजार २८१ जागा रिक्त आहेत.

11th admission
11th Admission: राज्यात अकरावीच्या १६ लाख जागा रिक्त! एकूण क्षमतेच्या तुलनेत केवळ २८.८८ टक्के जागांवर प्रवेश

कॅपअंतर्गत १८ लाख ५० हजार ८५८ जागांपैकी ८ लाख ३८ हजार ६०६ प्रवेश झाले असून १० लाख १२ हजार २५२ जागा रिक्त आहेत. तर विविध कोट्यांतील ३ लाख ६९ हजार ५६८ जागांपैकी १ लाख ३६ हजार ५३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून २ लाख ३३ हजार २९ जागा अद्याप रिक्त आहेत. शून्य फेरी त्यानंतर तीन नियमित फेरी झाल्यानंतर आता विशेष फेरी राज्यभरात सुरु आहे.

अतिवृष्टीमुळे अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रवेश निश्चितीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

11th admission
FYJC Admission 2026: अकरावी प्रवेश पहिली विशेष फेरी जाहीर; पुण्यात 28,234 विद्यार्थ्यांना महाविद्यालय वाटप

शिक्षण संचालनालयाने शनिवारी याबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या पहिल्या विशेष फेरीसाठी ४ लाख ८४ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे अलॉटमेंट देण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ९७ हजार ३८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश गेल्या दोन दिवसात महाविद्यालयात जावून निश्चित केला असून, त्यात १ लाख ८९ हजार ६५९ कॅप प्रवेश आणि ७ हजार ७२२ कोटा प्रवेश आहेत.

विभागनिहाय प्रवेशस्थिती

विभाग - अलॉटमेंट - प्रवेश

अमरावती -३१,३६० - १७,२२२

छ. संभाजीनगर- ४४,९३९ -२३,७६२

कोल्हापूर - ४७,४३५ - २४,७१२

लातूर - २३,७०३- १३,७२५

मुंबई- ९०,०३६ -३३,७१४

नागपूर -३४,५३६ -२३,३७५

नाशिक -४३,२१८ -२२,९१५

पुणे - ७७,४६६ - ३७,९५६

एकूण प्रवेश- ३,९२,६९३ - १,९७,३८१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news