FDA Action: अन्नसुरक्षेचा बडगा! १४ आस्थापनांवर कारवाई; पुण्यात सहा, वर्ध्यात पाच हॉटेल परवाने निलंबित

भिवंडीत १.५३ कोटींचा अन्नसाठा जप्त
FDA Action
FDA Actionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवली आहे. या कारवाईत भिवंडी येथे तब्बल १ कोटी ५३ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.

कराडमध्ये संशयित निकृष्ट दर्जाची प्रोटीन उत्पादने जप्त करण्यात आली, तर पुणे आणि वर्धा जिल्ह्यांतील ११ हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींचे परवाने निलंबित करण्यात आले.

FDA Action
Chandrashekhar Bawankule: बांधकाम परवानगीवेळी गौण खनिजाची माहिती अनिवार्य,लवकरच अध्यादेश काढणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

राज्यभरातील या मोहिमेत १४ आस्थापनांचे परवाने किंवा कामकाज निलंबित करण्यात आले. विविध कारवायांमध्ये १ कोटी ५३ लाख ५८ हजार ३६८ रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि वाहनासह ६७ लाख ५५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन गुन्हे दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

भिवंडीत ६८ टन अन्नघटक जप्त

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वेहळे येथील मे. युनिबॉर्न फूड इंग्रेडियंट्स एलएलपी या आस्थापनेच्या गोदामावर प्रशासनाने छापा टाकला. यावेळी ६८ हजार २४ किलो वजनाचा एक कोटी ५३ लाख १५ हजार ९७० रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.

FDA Action
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

यामध्ये विविध प्रकारचे स्टार्च, व्हे पावडर, सेल्युलोज गम, झॅन्थन गम, पिझ्झा पीठ, फेटा चीज आणि मॅस्करपोन यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.