FDA Food Safety Action: सणासुदीपूर्वी FDA ची मोठी कारवाई; पालघरमध्ये १.५० कोटींचा गुटखा जप्त

पुणे विभागात ९,६७५ किलो खाद्यतेल जप्त; अहिल्यानगरमध्ये २,०६५ किलो गुळाचा साठा ताब्यात
FDA
FDAPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: सणासुदीच्या काळात प्रतिबंधित, भेसळयुक्त आणि दर्जाहीन अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात १ कोटी ५० लाख ८६ हजार रुपयांचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आणि वाहन जप्त करण्यात आले.

नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागांतही अन्नपदार्थांविरोधात कारवाई करण्यात आली. पुणे विभागात २१ लाख ९४ हजार ७९७ रुपये किमतीचे ९ हजार ६७५.२ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले, तर अहिल्यानगरमध्ये २ हजार ६५ किलो गुळाचा साठा जप्त केला.

FDA
Breach Candy Hospital Tax Relief: ब्रिच कँडी रुग्णालयाला उच्च न्यायालयाचा दिलासा; आयकर विभागाचे आदेश रद्द

नाशिक विभागात ११ ऑक्टोबर रोजी एका आस्थापनातून ११ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि आठ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर विभागात १० ऑक्टोबर रोजी २७ हजार ४९ रुपये किमतीचा साठा आणि ५० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. नागपूर विभागात दोन आस्थापनांमधून एक लाख ७२ हजार ११३ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून, तीन व्यक्तींना अटक करण्यात आली.

FDA
Komasap Awards: कोमसापचे वाड्‍मयीन पुरस्कार जाहीर; कवी प्रवीण दवणे, बाळ कांदळकर, प्रवीण सोनावणे ठरले यंदाचे मानकरी

पुणे विभागात १० आणि ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या तपासणीत सहा आस्थापनांमधून ९ हजार ६७५.२ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत २१ लाख ९४ हजार ७९७ रुपये आहे. यामध्ये पुण्यातील मे. बन्सल ट्रेडिंग कंपनी, मार्केट यार्ड, गुलटेकडी येथून १,०६१ किलो, तर मे. रमेशलाल अँड सन्स, मार्केट यार्ड, गुलटेकडी येथून २,१०९ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यात मे. प्यारेळाल पोपटळाल भालगत आणि मे. गुगले कोल्ड स्टोरेज, शेंडी येथे तपासणी करण्यात आली. या कारवाईत एक लाख ७३ हजार ९२० रुपये किमतीचा २,०६५ किलो ‘कोहिनूर’ गुळाचा साठा जप्त करण्यात आला.

रायगडमध्ये तीन आस्थापनांचे परवाने रद्द

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील तळोजा येथे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या केंद्रांवर केलेल्या कारवाईत ५,३९४ लिटर दूध आणि ११९ किलो पनीर नष्ट करण्यात आले. तसेच १,०१९ किलो दही सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एकूण ३ लाख ८८ हजार ७४० रुपये किमतीच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली असून, तीन आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news