Mumbai FDA Action: दिवाळीत एफडीएची मोठी कारवाई; ३८ आस्थापनांचे परवाने निलंबित

१७ हजार ८०० किलोचे खाद्यपदार्थ जप्त; ६२ लाखांचा साठा ताब्यात
Mumbai FDA Action
Mumbai FDA ActionPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई वगळता राज्यातील सहा विभागांत तपासणी मोहीम तीव्र केली आहे.

६ आणि ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत ६८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, सुमारे १७ हजार ८०० किलो खाद्यपदार्थांचा ६२ लाख ६४ हजार ९८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नागपूर विभागात सर्वाधिक १८ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. नाशिक विभागात ९, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकी ३, अमरावतीत ३, तर कोकण विभागात २ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

या मोहिमेत मिठाई, खवा-मावा, पनीर, पेढे, फरसाण, दिवाळी फराळ, सुका मेवा आणि खाद्यतेल विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान उत्पादन व साठवणुकीच्या ठिकाणी अस्वच्छता, कीटक नियंत्रणाचा अभाव, खिडक्यांना जाळ्या नसणे, अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्या नोंदी नसणे, पाणी तपासणी अहवाल आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध नसणे, अशा त्रुटी आढळल्या.

Mumbai FDA Action
BMC Online Engineer Transfers: मुंबई महापालिकेत ऑनलाइन बदल्यांनंतर ५० अभियंत्यांची इमारत व कारखाने विभागात नियुक्ती

या मोहिमेत मिठाई, खवा-मावा, पनीर, पेढे, फरसाण, दिवाळी फराळ, सुका मेवा आणि खाद्यतेल विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान उत्पादन व साठवणुकीच्या ठिकाणी अस्वच्छता, कीटक नियंत्रणाचा अभाव, खिडक्यांना जाळ्या नसणे, अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्या नोंदी नसणे, पाणी तपासणी अहवाल आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध नसणे, अशा त्रुटी आढळल्या.

महामार्गावरून वाहतूक होत असलेल्या वाहनांतूनही मोठ्या प्रमाणात खवा आणि मिठाई जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काजू कतली, कलाकंद, बर्फी, हलवा, चकली, चिवडा, नमकीन, पनीर, तूप, बदाम आणि खाद्यतेलाचा समावेश आहे. आरोग्यास घातक ठरू शकणारे नाशवंत पदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले.

Mumbai FDA Action
Mumbai Water Supply: मुंबईकरांना पाणीटंचाईची सवय झाली का?पाणीपुरवठ्यात ४०० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त घट

पुणे विभागात ३ हजार १४२ किलो, कोकण विभागात १३ हजार ९७० किलो, छत्रपती संभाजीनगर विभागात ६५२ किलो आणि अमरावती विभागात ३६.५ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. दरम्यान, संबंधित आस्थापनांवर अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.