FDA Raids : एफडीएचे महिनाभरात ९०४ छापे

३४.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त; ४५७ जणांना अटक
FDA Raids
एफडीएचे महिनाभरात ९०४ छापेpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच बेकायदेशीर औषध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महिनाभरात राज्यव्यापी धडक मोहीम राबवत ९०४ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये ३४ कोटी ६६ लाख ९० हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४५७ जणांना अटक करण्यात आली आहे. ३२२ आस्थापना सील करून ४२ वाहने जप्त करण्यात आली अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तुकाराम मुंढे म्हणाले, २५ मे ते २४ जून २०२६ या कालावधीत मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात या कारवाया करण्यात आल्या. प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विरोधातील मोहिमेत ४४६ आस्थापनांवर छापे टाकून ५ कोटी ५५ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांमध्ये ४५७ आरोपींना अटक करण्यात आली.

FDA Raids
Tukaram Mundhe FDA Action: तीन दिवसांत 33 अटकेत, 25 एफआयआर; अन्न व औषध प्रशासनात तुकाराम मुंढे पॅटर्न

याशिवाय भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांवर कारवाई करत एफडीएने ४४० आस्थापनांची तपासणी केली. आंबे, बाटलीबंद पाणी, खवा, बेकरी पदार्थ, मसाले, खाद्यतेल, तूप, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट यांसह विविध खाद्यपदार्थांचा २९ कोटी ११ लाख रुपयांचा आणि २२ लाख किलोहून अधिक साठा जप्त करण्यात आला, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

औषध विभागानेही मोठी कारवाई करत एका महिन्यात ५५ धाडी टाकल्या. औषधे, वैद्यकीय उपकरणे, सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांवर एकूण ५ कोटी ५२लाख रुपयांची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दिशाभूल करणाऱ्या औषध जाहिरातींवर ३१ कारवाया करण्यात आल्या, तर ९५ प्रकारच्या २९७ उत्पादनांवर नियामक कारवाई झाली, असे मुंढे म्हणाले.

FDA Raids
FDA Safe Maharashtra Campaign: भेसळ सम्राटांविरुद्ध एफडीएची मोहीम; सहा दिवसांत 203 कारवाया; 102 अटकेत

पुणे मद्य विषबाधा प्रकरणाच्या तपासात भिवंडीतील पुरवठादाराकडून ५९२९ किलो मिथेनॉल जप्त करण्यात आले. तसेच मुंबई, भिवंडी आणि पालघर येथे वैद्यकीय उपकरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर २ कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. एफडीएने बोगस औषध व्यवसाय, बनावट औषधे, एनडीपीएस कायद्यांतर्गत औषधांचा गैरवापर, तसेच परवान्याविना औषध उत्पादन आणि विक्री याविरोधातही कठोर पावले उचलली. ९ एफआयआर दाखल करण्यात आले असून २ आरोपींना अटक करण्यात आली, असेही मुंढे यांनी सांगितले.

  • महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि कायदेशीर उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची कठोर अंमलबजावणी सुरू राहील. सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news