Political News: दुष्काळातही गरबा इव्हेंटवर १०० कोटींची उधळपट्टी; काँग्रेसचे टीकास्‍त्र

व्‍हीआयपींच्‍या गाड्या खरेदीवर राष्‍ट्रवादीची टीका
Garba Event
Garba EventPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्यात १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ पडलेला आहे, ३०५ तालुक्यांना या दुष्काळाची झळ पोहचलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.

दसरा-दिवाळी आली तरी सणासाठी हातात पैसा नाही अशी अत्यंत वाईट परिस्थिती असताना सत्ताधारी भाजपा नेते मात्र मुंबईसह ठाण्यात गरब्याच्या भपकेबाज इव्हेंटबाजीवर जवळपास १०० कोटी रुपयांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

मंत्री आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या आमदारांनी मुंबईत गरब्याचे फड रंगवले आहेत. जनतेला काटकसर करण्याचे सल्ले सरकार देते, पण गरब्याचे फड लावणाऱ्या भाजप नेत्यांचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

Garba Event
Anna Bansode: राहुल नार्वेकरांना जो न्याय, तो मला का नाही? उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सवाल

सध्या नवरात्र उत्सव सुरु असून देवीची आराधना केली जात आहे.पण सध्याची परिस्थिती पाहता उत्सव साधेपणाने साजरा करता येऊ शकतो. भाजपाचे नेते उत्सवाच्या नावाखाली गरब्याचे आयोजन करून करोडो रुपयांची उधळण करत आहेत.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, संजय उपाध्याय, विनोद शेलार यांनी गरब्यावर भरमसाट खर्च केला आहे, हा प्रकार दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

Garba Event
FDA Malegaon Supari Case: सुपारी प्रकरणात एफडीएची कोंडी वाढली! पाच अधिकारी निलंबित, आणखी २० जणांवर कारवाईची शक्यता

वाहन खरेदीवर राष्‍ट्रवादीची टीका

दरम्‍यान, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुष्काळाच्या झळा बसत असताना राज्य सरकारने व्हीआयपींसाठी १२ कोटींच्या ४० वातानुकूलित गाड्या घेण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय तातडीने रद्द करून हा निधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वापरावा, अशी मागणी त्यांनी केली.

शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, मुंबईतील शासकीय परिवहन सेवा आणि विविध जिल्हाधिकारी कार्यालयांच्या राजशिष्टाचार शाखांसाठी ४४ नवीन वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news