Marathi Films | मराठी नाटक, चित्रपट आता एकाच थिएटरमध्ये

नियोजन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Marathi Theater
मराठी नाटक, चित्रपट आता एकाच थिएटरमध्येFile Photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येतील का, तसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का, याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करून त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी विभागाचे सादरीकरण केले. त्यांनी सादरीकरणातून नगरविकास विभागाच्या अखत्यारित असलेले विविध नियोजन प्राधिकरण यांचे सक्षमीकरण करणे, शहरांजवळील सुमारे साडेतीन हजार गावांत रस्ते विकासाचे नियोजन करणे, राज्यातील दहा लाखांवरील शहरांत नागरी संकल्प प्रकल्प राबविणे, इमारत परवाने देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करणे, पर्यटन धोरणानुसार एकत्रित नागरी विकास आणि नियंत्रण नियमावलीत बदल करण्याबाबतची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news