Maharashtra CET Student Data Leak: होय.. CET च्या विद्यार्थ्यांचा गोपनीय डेटा लीक झालाय! शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ

Maharashtra CET Student Data Leak
Maharashtra CET Student Data Leakpudhari
Published on
Updated on

Maharashtra CET Student Data Leak: महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाशी संबंधित तब्बल ४ लाख ५९ हजार ४९३ विद्यार्थ्यांची अत्यंत गोपनीय वैयक्तिक माहिती लीक झाल्याची गंभीर घटना उजेडात आली असून, यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सीईटी सेलच्या प्रशासनाने मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात अधिकृत पत्र देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

Maharashtra CET Student Data Leak
MHT CET Data Leak: MHT-CET डेटा लीकचा गंभीर आरोप; विद्यार्थ्यांचा खासगी डेटा विकल्याचा दावा, अहिल्यानगरात मोर्चा

१ सप्टेंबर २०२६ रोजी नारायण शिंगारे यांनी ही डेटा लीक झाल्याची बाब सीईटी सेलच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर तात्काळ पावले उचलत सीईटी सेलच्या संगणकांची व यंत्रणेची फॉरेन्सिक तपासणी (Forensic Audit) करण्यात आली. या तांत्रिक तपासात माहिती बाहेर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली तीव्र झाल्या.

Maharashtra CET Student Data Leak
CET Cell Admission Rules: संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी सेलचे कडक नियम; पारदर्शकता बंधनकारक

आज, ४ सप्टेंबर २०२६ रोजी आमदार रोहित पवार यांनी सीईटी कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या गंभीर डेटा लीक प्रकरणी तात्काळ पोलीस तक्रार दाखल करून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Maharashtra CET Student Data Leak
Rohit Pawar: MHT-CET वर रोहित पवारांचा गंभीर आरोप! परीक्षेत मोठा घोळ; पैशांचा खेळ सुरु, फॉरेन्सिक ऑडिटची केली मागणी

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर आणि तक्रारीनुसार, सीईटी सेलचे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडावी यांनी आझाद मैदान पोलिसांना अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात पोलिसांनी नियमांनुसार तात्काळ आवश्यक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या पोलीस तपासात सीईटी सेलकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचा हा प्रश्न असल्यामुळे पोलीस या प्रकरणात नेमका काय तपास करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news