महापरिवर्तन महाशक्तीची 10 जागांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Assembly elections | बच्चु कडू, वामनराव चटप, सुभाष साबणे यांचा समावेश
महापरिवर्तन महाशक्तीची 10 जागांची पहिली यादी जाहीर
Published on
Updated on

17 जणांना एबी फॉर्म

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आल्याचे समजते आहे. यामध्ये नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील या दिग्गज नावांचा समावेश आहे.

"परिवर्तन महाशक्ती" महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ अधिकृत उमेदवारांची यादी

  • ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू (प्रहार जनशक्ती पक्ष) : अचलपूर (मतदार संघ ४२)

  • अनिल छबिलदास चौधरी (प्रहार जनशक्ती पक्ष) : रावेर यावल (मतदार संघ ११)

  • गणेश रमेश निंबाळकर (प्रहार जनशक्ती पक्ष) : चांदवड (मतदार संघ ११८)

  • सुभाष साबणे (प्रहार जनशक्ती पक्ष) : देगलूर बिलोली (SC) (मतदार संघ ९०)

  • अंकुश सखाराम कदम (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) : ऐरोली (मतदार संघ १५०)

  • माधव दादाराव देवसरकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) : हद‌गाव हिमायतनगर (मतदार संघ ८४)

  • गोविंदराव सयाजीराव भवर (महाराष्ट्र राज्य समिती) : हिंगोली (मतदार संघ ९४)

  • वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) : राजुरा (मतदार संघ ७०)

महापरिवर्तन महाशक्तीची दहा जागांची पहिली यादी जाहीर

पुण्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे, प्रहार जनशक्तीचे बच्चु कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आपल्या यादीची घोषणा केली. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, प्रहारचे अनिल चौधरी आदी उपस्थित होते. महापरिवर्तन महाशक्तीच्या वतीने राज्यातील दहा जागांची यादी जाहीर केली. या यादीत प्रहार जनशक्तीचे बच्चु कडू यांचा समावेश आहे.

मनसेची दुसरी यादी सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर होणार

मनसेची दुसरी यादी सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर होईल. राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे बोलताना याची माहिती दिली. राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाटील यांना कल्याण ग्रामिणमधून तर जाधव यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. 24 ऑक्टोबर रोजी दोघांचे अर्ज भरण्यात येणार असून यावेळी स्वत: राज ठाकरे उपस्थिती असणार आहेत.

तर पिता-पुत्र आमनेसामने

दिंडोरी जागेवरून महायुतीमधील तिढा सुटला आहे. येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून गोकुळ झिरवळ हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. जर त्यांना उमेदवारी देण्यात आली तर दिंडोरी मतदार संघात पिता-पुत्र आमनेसामने असतील. मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमित शाह आणि संजय राऊतांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही : वड्डेट्टीवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची बातमी पसरली आहे. मात्र, शाह आणि राऊत यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना महाविकास आघाडीसोबतच आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत वाद व्हावा, असे काहींचे षडयंत्र आहे, असे सांगत काँग्रेसचे नेते विजय वड्डेट्टीवार यांनी या चर्चांना विराम दिला. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला असेल, असेही वड्डेट्टीवार यांनी सांगितले.

शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर होणार

शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. ६० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; ज्ञानेश्वर कटके अजित पवार गटात

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी आज (दि. २१) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

रमेश चेन्निथला

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणतात, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र आहोत. जागांबाबत बोलणी सुरू आहे, लवकरच ती सोडवली जाईल.

उद्धव ठाकरे काँग्रेसचीच जागा का मागतात?

उद्धव ठाकरे काँग्रेसचीच जागा का मागतात? काँग्रेसला शिवसेनेकडून वेठीस धरलं जातंय, अशी तक्रार काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत हायकमांडकडे केली असल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद

उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.

काँग्रेसची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर होणार : वडेट्टीवार

विदर्भात काही जागांवर वाद आहेत, मात्र फार नाहीत. ६ ते ७ जागांसंदर्भात आमची चर्चा सरू आहे. काँग्रेसची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर करणार आहे, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

'मविआ'ची पहिली यादी केव्‍हा जाहीर होणार?, संजय राऊत म्‍हणाले...

भाजपने पहिली यादी जाहीर करुन मोठा तीर मारलेला नाही, असे सांगत महाविकास आघाडीत जागा वाटपावरु चर्चा सुरु आहे. आजही शरद पवार यांच्‍याबरोबर चर्चा झाली. निवडणुका एकत्र लढवायच्या असताना तेव्हा एक पाऊल मागं पुढं टाकावी लागतात, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी विरुद्ध परिवर्तन आणि वंचित बहुजन विकास आघाडी अशी चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) भाजपने जाहीर केली आहे. काँग्रेसचे राज्यातील नेते जागावाटपावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी रविवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र त्यांची बैठक होऊ शकली नाही. ही बैठक आज होत आहे. यानंतर काँग्रेसचे नेते राज्यात परततील आणि उर्वरित जागांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न होतील. पाहा विधानसभा निवडणूक Live Updates...

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news