ANM GNM Admission 2026 : एएनएम, जीएनएमची पहिली गुणवत्ता यादी अखेर जाहीर

३१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; १६ नोव्हेंबरपर्यंत करावा लागणार प्रवेश निश्चित
ANM GNM Admission 2026
ANM GNM Admission 2026pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : राज्यातील एएनएम आणि जीएनएम पदविका अभ्यासक्रमांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून या फेरीत ३१ हजार १४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, शिष्यवृत्ती व फ्रीशिपचा लाभ मिळविण्यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील एएनएम आणि जीएनएम पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीभूत पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेल्या विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला होता. पहिल्या फेरीत जवळपास ३१ हजार १४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

ANM GNM Admission 2026
Farmer eKYC : शासकीय मदतीसाठी तातडीने ई-केवायसी करा

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांचे प्रवेश बारावीच्या गुणांच्या आधारे करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व संस्थांमधील प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जात आहेत. राज्यात एएनएम आणि जीएनएमची एकूण १ हजार ३०१ महाविद्यालये असून, त्यांची प्रवेश क्षमता ५४ हजार २८५ जागा आहे.

पहिल्या फेरीत ३१ हजार १४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

ANM GNM Admission 2026
CSMT Bomb Threat : सीएसएमटी रेल्वे स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी

पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि फ्रीशिप योजनांच्या लाभासाठी पात्र राहणार आहेत. त्यामुळे खासगी संस्थांमध्ये थेट प्रवेश घेण्याऐवजी विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.