Farmer eKYC : शासकीय मदतीसाठी तातडीने ई-केवायसी करा

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत व पुनर्वसन विभागाचे आवाहन
Farmer eKYC
Farmer eKYCpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून फार्मर आयडी प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, दीड कोटी पात्र शेतकर्‍यांसाठी ७,५०० कोटींची रक्कम मदत व पुनर्वसन विभागाकडे वर्ग करण्यात आली होती. यातून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पाच हजारांची अग्रीम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

Farmer eKYC
Narendra Modi : नक्षलवादावर आधीची सरकारे बघ्यांच्या भूमिकेत

मात्र, शेतकरी ओळख क्रमांक (ॲग्रीस्टेक) नसणे तसेच ई-केवायसीही केली नसल्याने अद्याप ५० लाख शेतकर्‍यांच्या खात्यात अग्रीम जमा होऊ शकली नाही. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन विभागाने शेतकर्‍यांना विशेषतः दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना तातडीने ॲग्रीस्टॅक प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे.

शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, अनुदान व अन्य लाभ देण्यात येतात. यापूर्वीही शासनाने विविध संकटांच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसी व फार्मर आयडीचे महत्त्व अधिक वाढले आहे.

पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे. ॲग्रीस्टॅक प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती एकत्रित व अद्ययावत करण्यात येत असून, विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरत आहे.

Farmer eKYC
Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबाराचे ठाणे कनेक्शन

योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी ई-केवायसी व फार्मर आयडी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करण्यासाठी जवळच्या सीएससी (नागरी सुविधा केंद्र) येथे आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकासह जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावा. राज्यातील शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.