Mahabharat actor Aayush Shah cheated of 4 crore | 'महाभारत' माालिकेतील अश्वत्थाम्याला ४ कोटींचा गंडा

Mahabharat actor Aayush Shah cheated of 4 crore - 'महाभारत' माालिकेतील अश्वत्थाम्याला ४ कोटींचा गंडा
Mahabharat actor Aayush Shah cheated of 4 crore
Mahabharat actor Aayush Shah cheated of 4 crore
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध अभिनेता आयुष शाहची ४ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत अश्वत्थामाची भूमिका साकारलेल्या आयुषला विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून आरोपींनी हा गंडा घातल्याचा बनावट बँक स्टेटमेंट दाखवून गुंतवणुकीचे आमिष आरोप आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी बिश्वजित बादलचंद्र घोष, पियाली चॅटर्जी, बिजोया दास, शाबाब हुसैन आणि बादलचंद्र घोष यांच्याविरोधात ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस तक्रारीनुसार, आरोपींनी सुरुवातीला आयुष शाह याचा विश्वास संपादन केला. मुंबईस्थित एका व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित कंपनीच्या माध्यमातून विमान वाहतूक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला आर्थिक फायदा होईल, असे त्याला सांगण्यात आले. यामध्ये फ्लेज इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटीसह अन्य कंपन्यांचा समावेश होता.

गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा मिळत असल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी कथितरीत्या बनावट बँक स्टेटमेंट तयार करून आयुषला पाठवले. या स्टेटमेंटमध्ये गुंतवणुकीतून नियमित आर्थिक परतावा मिळत असल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्यामुळे आरोपींच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आयुषने वेगवेगळ्या टप्प्यांत मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले.

मात्र, अपेक्षित परतावा मिळत आणि आर्थिक नसल्याने व्यवहारांबाबत संशय निर्माण झाल्याने आयुषने चौकशी केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आरोपींनी २०२१ ते २०२५ या कालावधीत गुंतवणुकीच्या नावाखाली एकूण ४ कोटी ४४ लाख ४८ हजार रुपये घेतल्याचा आरोप त्याने तक्रारीत केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.