LTT Mega Block: लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ५६ तासांचा विशेष ब्लॉक

या कालावधीत काही मेल आणि एक्सप्रेस गाड्या स्थानकाआधीच शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत.
LTT Mega Block
LTT Mega BlockPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला ) येथे पायाभूत सुविधांच्या कामांसाठी येत्या २४ जून ते २६ जून या कालावधीत विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा परिणाम निवडक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या निर्धारित सेवेवर होणार आहे.

LTT Mega Block
Mumbai Water Crisis: मुंबईवर ३०% पाणीकपातीचे सावट; तलावांमध्ये अवघा ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक

येत्या (बुधवार) २४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ( शुक्रवार) २६ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत असा ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे. या कालावधीत काही मेल आणि एक्सप्रेस गाड्या स्थानकाआधीच शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत.

तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी हे बदललेले वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे अशा सूचना मध्य देण्यात आल्या आहेत.

LTT Mega Block
Women Empowerment: शासकीय पडीक जमिनी महिला बचत गटांना

या विशेष ट्रॅफिक ब्लॉक दरम्यान शंटिंग नेकचे बांधकाम, 'सिक साइडिंग'मध्ये बदल, देखभाल साइडिंग यार्ड, देखभाल साइडिंग क्र. ६, ७, ८ आणि ९ मधील 'पिट लाइन्स'चा विस्तार तसेच पाणीपुरवठा वाहिनी, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीचे वळण बदलणे यासारखी कामे केली जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news