Ghansoli Shelter News: घणसोलीतील रात्र निवारा केंद्रात गांजा, दारूच्या बाटल्या

प्रत्यक्ष पाहणीत धक्कादायक प्रकार उघड; व्यवस्थापकाच्या खोलीच्या तपासाची मागणी
Ghansoli Shelter
Ghansoli ShelterPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: घणसोली सेक्टर-४, भूखंड क्र. २४० येथील नवी मुंबई महापालिकेच्या रात्री निवारा केंद्रात गांजा व दारूच्या बाटल्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरसेवक सौरभ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह या निवारा केंद्राची पाहणी केली असता व्यवस्थापक राहुल वाडे यांच्या खोलीत संशयास्पद स्वरूपातील गांजा व दारूच्या बाटल्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या निवारा केंद्राच्या व्यवस्थापनावरगंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.घणसोलीतील संबंधित सोसायटीतील नागरिकांकडून निवारा केंद्राच्या परिसरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Ghansoli Shelter
BLO Suspension: एसआयआरची गणनापत्रके झेरॉक्सच्या दुकानात! पाच बीएलओ निलंबित

त्यानंतर नगरसेवक सौरभ शिंदे यांनी अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान निवारा केंद्रातील व्यवस्थापकाच्या वैयक्तिक खोलीत गांजा व दारूच्या बाटल्या आढळल्याचे सांगण्यात आले. बेघर, ज्येष्ठ आणि गरजू नागरिकांना सुरक्षित निवारा देण्यासाठी असलेल्या महापालिकेच्या केंद्रात अमली पदार्थ व मद्याशी संबंधित साहित्य आढळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या केंद्रात वास्तव्यास असलेल्या बेघर व ज्येष्ठ नागरिकांना पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळतात का, वेळेवर अन्न दिले जाते का आणि त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाते का, याबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Ghansoli Shelter
Mumbai Mega Block: उद्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

काही नागरिकांना बंदिस्त वातावरणात ठेवले जात असल्याचा आरोपही पाहणीदरम्यान करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, निवारा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज व नोंदी तपासाव्यात, संबंधित व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी तसेच गांजा व दारूच्या बाटल्यांबाबत पोलिसांकडून स्वतंत्र तपास करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक सौरभ शिंदे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news