Lalbaugcha Raja Visarjan 2025: भरतीमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये व्यत्यय

लालबागचा राजाच्या विसर्जनामध्ये व्यत्यय आला आहे. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची मूर्ती घेऊन आलेली ट्रॉली वाळूत अडकली.
Lalbaugcha Raja Visarjan 2025
Lalbaugcha Raja Visarjan 2025pudhari photo
Published on
Updated on

Lalbaugcha Raja Visarjan 2025

मुंबई : लालबागचा राजाच्या विसर्जनामध्ये व्यत्यय आला आहे. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची मूर्ती घेऊन आलेली ट्रॉली वाळूत अडकली. त्यातच समुद्राला भरती असल्यामुळे लाटांचा जोरदार मारा सुरू आहे. त्यामुळे ट्रॉली पुढे ढकलण्यास अडचण येत आहे.

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ओहोटीची वाट पहावी लागणार आहे. असंख्य भक्तांचा जनसमुदाय गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची वाट पाहत उभा आहे. नवीन बनवलेल्या तराफ्यावर लालबागच्या राजाला विराजमान करून विसर्जन करण्याचा मंडळाचा विचार आहे. पण सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालबागच्या राजाची शेवटची आरती अजून शिल्लक राहिली आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांच्या चपलांचा अक्षरश ढीग पडला आहे.

कसं होणार विसर्जन?

लालबाग राजासाठी तयार करण्यात आलेला अत्याधुनिक स्वयंचलित तराफा हा मागील तराफ्याच्या तुलनेत दुप्पट मोठा आहे. हा तराफा पाण्यात ३६०डिग्रीमध्ये कुठेही वळण घेऊ शकतो. मागील वर्षीच्या तराफ्याला कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने सुमद्रात ओढून न्ह्यावं लागत होतं. हा अत्याधुनिक तराफा स्वयंचलित आहे.

अनंत अंबानी विसर्जन मिरवणुकीत सहभागी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​संचालक अनंत अंबानी हे देखील लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मिरवणुकीत सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news