Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या दर्शनाआधीच काळाचा घाला! रांगेत उभ्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगावच्या २५ वर्षीय जयदीप नेमाडे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. दर्शनाच्या रांगेत असताना त्यांना अस्वस्थ वाटले.
Lalbaugcha Raja
Lalbaugcha RajaPudhari
Published on
Updated on

मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जयदीप मेघराज नेमाडे असे मृत तरुणाचे नाव आहे.

१७ सप्टेंबर रोजी रात्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. गुदमरण्याचा त्रास होत असल्याचे त्याने मित्रांना सांगितले आणि तो रांगेतून बाहेर पडला.

Lalbaugcha Raja
Mumbai Car Accident : मुंबईत भरधाव बीएमडब्ल्यू कारला भीषण अपघात, तीन तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी

मात्र, काही वेळातच त्याची प्रकृती अधिक खालावली. पोलिसांनी तातडीने त्याला मदत कक्षात नेले आणि त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

Lalbaugcha Raja
Mumbai Illegal Construction: मुंबईतील झोपड्यांवर पालिकेची नजर! १४ फूटांपेक्षा उंच बांधकामांवर १ ऑक्टोबरपासून कारवाई

जयदीप हा जळगावमधील नेमाडे ट्रान्स्पोर्टचे संचालक मेघराज सुभाष नेमाडे यांचा एकुलता एक मुलगा होता. जळगावमधील जीवनमोती सोसायटी, शिरसोली रोड येथे त्यांचे वास्तव्य आहे. जयदीपने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमबीएची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पुण्यात नोकरी करत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news